मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : फक्त ऋषभ पंतच नाही, तर हे दोन खेळाडूही धोकादायक!

WTC Final : फक्त ऋषभ पंतच नाही, तर हे दोन खेळाडूही धोकादायक!

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने 24 खेळाडूंची निवड केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने 24 खेळाडूंची निवड केली आहे. यात विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश आहे. पण सध्याचा फॉर्म बघता ऋषभ पंतलाच अंतिम-11 मध्ये संधी मिळेल, हे निश्चित आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही (Michael Vaughan) ऋषभ पंत हा सध्याचा जागतिक क्रिकेटमधला स्टार आहे, असं म्हणत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सगळ्यांचं लक्ष ऋषभ पंतवर असेल, अशी प्रतिक्रिया मायकल वॉनने दिली.

वॉनने क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत भाष्य केलं. या सामन्यात माझं लक्ष तीन खेळाडूंवर असेल. यामध्ये ऋषभ पंत, काईल जेमिसन (Kyle Jamieson) आणि बीजे वॉटलिंग (BJ Watling) यांचा समावेश आहे, असं मायकल वॉन म्हणाला. मागच्या काही महिन्यांमध्ये पंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली.

या वर्षी ऋषभ पंतने 6 टेस्टच्या 10 इनिंगमध्ये 64.37 च्या सरासरीने 515 रन केले, यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानात झालेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. रोहित शर्मानंतर तो सर्वाधिक रन करणारा भारतीय खेळाडू होता. पंतने 4 टेस्टमध्ये 270 रन केले होते, तसंच त्याने 10 सिक्सही मारल्या होत्या.

मायकल वॉन काईल जेमिसनच्या बॉलिंगमुळेही प्रभावित झाला आहे. 6 पूट 8 इंच उंची असलेल्या या फास्ट बॉलरने आपल्या छोट्याशा करियरमध्ये प्रतिभा दाखवली आहे. 6 टेस्टमध्ये त्याने 13.27 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 4 वेळा 5 विकेट आणि एकदा 10 विकेट घेतल्या. याशिवाय मायकल वॉनच्या मते बीजे वॉटलिंगही न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, असं वॉनला वाटतं.

वॉटलिंग 2013 पासून न्यूझीलंडसाठी पूर्णवेळ विकेट कीपिंग करत आहे, त्याने 73 टेस्टमध्ये 3,773 रन केले, यात 8 शतकं आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. वॉटलिंगने भारताविरुद्ध 8 टेस्टमध्ये एका शतकाच्या मदतीने 269 रन केले.

First published:

Tags: Cricket news, Rishabh pant, Team india