साऊथम्पटन, 7 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. साऊथम्पटनच्या मैदानात हा ऐतिहासिक मुकाबला होईल. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या टीमला इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांना तिथल्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा अंदाज यायला मदत होणार आहे. तर विराटच्या टीमला मात्र अशी संधी मिळणार नाही.
3 जूनला भारतीय टीम इंग्लंडमध्ये पोहोचली, यानंतर त्यांच्या सरावालाही सुरुवात झाली, पण विराट कोहली (Virat Kohli) अंतिम-11 खेळाडूंमध्ये कोणाला संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वेस्ट इंडिजचे महान बॉलर मायकल होल्डिंग (Michael Holding) यांनी टीम इंडियाविषयी आपलं मत मांडलं.
न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध खेळत असल्यामुळे त्यांना फायनलमध्ये फायदा होईल, तसंच इंग्लंडमधलं वातावरणही न्यूझीलंडसारखंच आहे, असं मत अनेक तज्ज्ञांनी आणि क्रिकेटपटूंनी मांडलं आहे. पण होल्डिंग यांना मात्र भारतीय टीम त्यांच्याकडे असलेल्या बॉलिंग आक्रमणामुळे आघाडी घेऊ शकतो, असं वाटतं. द टेलिग्राफशी बोलताना होल्डिंग म्हणाले, 'जर मोसम साफ असेल तर भारत दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरू शकतो. पण जर त्यांनी एकच स्पिनर घेऊन खेळवायचं ठरवलं, तर अश्विनला (R Ashwin) संधी देण्यात यावी.'
'इंग्लंडमध्ये परिस्थिती भूमिका निभावेल. पण भारताला त्यांच्या बॉलिंग आक्रमणामुळे मदत मिळेल. वातावरण साफ असेल, तर विराट दोन स्पिनरना घेऊन खेळू शकतो, पण ढगाळ वातावरणात एकच स्पिनर खेळवावा लागेल, त्यामुळे जडेजाऐवजी (Ravindra Jadeja) अश्विनला संधी मिळू शकतो. अश्विन बॅटिंगही करू शकतो, तसंच इथल्या खेळपट्टीवर बॉल स्पिनही होतो, त्यामुळे भारतालाही खेळपट्टी आवडेल,' अशी प्रतिक्रिया होल्डिंग यांनी दिली.
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा
स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, R ashwin, Ravindra jadeja, Team india, Virat kohli