मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : ब्रिटनची परवानगी नाही, तरी टीम इंडियाच्या खेळाडूने घेतला 'तो' निर्णय

WTC Final : ब्रिटनची परवानगी नाही, तरी टीम इंडियाच्या खेळाडूने घेतला 'तो' निर्णय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमचे खेळाडू (Team India) मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमचे खेळाडू (Team India) मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. टीमचा ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), आर.अश्विन (R Ashwin), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) मुंबईत आले आहेत. त्यांच्यासोबत महिला टीमची कर्णधार मिताली राजही (Mithali Raj) आहे. इंग्लंडच्या 4 महिन्यांच्या या दौऱ्यासाठी मयंक अग्रवालसोबत त्याची पत्नी आशिता सूदही आहे, पण ब्रिटन सरकारने अजून कुटुंबाला आणण्याची परवानगी दिलेली नाही.

मयंक अग्रवालने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला. यामध्ये त्याने फेस शिल्ड घातलं आहे, त्याच्यासोबत त्याची पत्नीही दिसत आहे. बीसीसीआयने तीन शहरांमधून चार्टर विमानांची सोय केली आहे. चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीमधून खेळाडू मुंबईत दाखल होतील.

भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला पोहोचेल, तिकडेही त्यांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, पण खेळाडूंना सराव करता येणार आहे. साऊथम्पटनच्या स्टेडियममध्ये हॉटेल असल्यामुळे खेळाडूंना सरावाला परवानगी देण्यात आली आहे. 18 ते 22 जून या काळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज इंग्लंडमध्येच खेळवली जाईल.

मायकल वॉनची भविष्यवाणी

'इंग्लंडमधलं वातावरण, ड्युक बॉल, भारताचा व्यस्त कार्यक्रम, हे सगळं बघता फायलनमध्ये न्यूझीलंडचा विजय होईल. भारत जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचेल, तेव्हा न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट खेळून झाल्या असतील. फायनल आधी किवी टीम या दोन टेस्टमध्ये तयारी करू शकेल. न्यूझीलंडची तयारी चांगली झाली असेल, तसंच लाल बॉलने क्रिकेट खेळलेले खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध असतील,' असं मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला.

First published:

Tags: Cricket news, Team india