WTC Final: बुमराहची कामगिरी खालावली? चुकीवर बोट ठेवत VVS लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य

साऊथम्पटनमध्ये भारतीय बॅट्समन्स अपयशी ठरले आहेतच पण बॉलरनेही निराशा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा महत्त्वाचे बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट मिळालेली नाही

साऊथम्पटनमध्ये भारतीय बॅट्समन्स अपयशी ठरले आहेतच पण बॉलरनेही निराशा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा महत्त्वाचे बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट मिळालेली नाही

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल मॅच (WTC Final Match) सध्या ब्रिटनमधील साऊथम्पटनमध्ये सुरू आहे. भारतविरुद्ध न्यूझीलंड (India Vs New Zealand) असा हा कसोटी सामना सुरू आहे. पण या सामन्यावर पावसाचा सावट कायम आहे. पावसामुळे पहिला दिवस वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पाऊस झाला आणि एकही बॉल टाकला गेला नाही. तसं पहायलं गेलं तर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडची कामगिरी चांगली आहे. न्यूझीलंडने भारतीय संघाला 217 रनमध्ये बाद केलं आणि त्यांच्या पहिल्या डावात त्यांनी 2 बाद 101 रन्स केल्या आहेत. साऊथम्पटनमध्ये भारतीय बॅट्समन्स अपयशी ठरले आहेतच पण बॉलरनेही निराशा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा महत्त्वाचे बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट मिळालेली नाही. आणि तो का विकेट घेऊ शकत नाहीए किंवा त्याच्याकडून काय चूक होते आहे याच्यावर माजी बॅट्समन आणि कॉमेंट्रेटर व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) बोट ठेवलंय. हे वाचा-WTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात? स्टार स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘जसप्रीत बुमराहने वापरलेली रणनीति पाहून मी अवाक झालो आहे. आपल्या बॉलिंगची लेंग्थ बदलण्यात बुमराहला अपयश येतंय हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यामुळे त्याला विकेट मिळत नाही आहे. इंग्लंडमध्ये (England) तुम्हाला पुढच्या बाजूला टप्पा पडेल अशी बॉलिंग करावी लागते. बॅट्समनला क्रीजच्या बाहेर जाऊन फटका मारायला भाग पाडेल अशी बॉलिंग तुम्ही करायची असते. शरीरापासन दूर बॉल खेळायला लागण्यासाठी बॉलरने बॅट्समनला भाग पाडलंच पाहिजे. पण तसं दिसत नाही.’ लक्ष्मण हा अनुभवी खेळाडू आहे त्याने आपल्या संघातील आघाडीच्या बॉलरची चूक दाखवून दिली आहे. त्यावर जसप्रीत बुमराहने विचार करून आपल्या बॉलिंगमध्ये सुधारणा केली तर नक्कीच फरक पडू शकतो. सामान्यपणे ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू नवोदितांना सल्ला देत असतात. आणि नवोदितही तो सल्ला वाजवी वाटला तर खेळात बदल करतात. हे वाचा-WTC Final : पाऊस बघून पीटरसनची सटकली, ICC वर साधला निशाणा बुमराहची कामगिरी खालावली गेल्या काही काळापासून बुमराहला विकेट्स मिळत नाही आहेत. गेल्या 6 डावांत त्याला फक्त 7 विकेट्स मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी त्याने 8 डावांत 14 विकेट्स घेतल्या होत्या. दिवसेंदिवस बुमराहची कामगिरी खालावत चालली असून त्याचा फॉर्म असाच राहिला तर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या भारताच्या टेस्ट मालिकेवरही परिणाम होऊ शकतो. भारत पाच टेस्ट मॅच खेळणार (Test Match series) असून त्यात भारताता आघाडीचा पेस बॉलर जसप्रीत बुमराहच्या कामगिरीला प्रचंड महत्त्व आहे. बुमराहने वेळीच आपल्या खेळात सुधारणा केली तर ते टीम इंडियाच्या दृष्टिने फायद्याचे ठरेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published: