• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • टीम इंडियात बदलाचे वारे, विराट आणि या खेळाडूबाबत होणार मोठा निर्णय!

टीम इंडियात बदलाचे वारे, विराट आणि या खेळाडूबाबत होणार मोठा निर्णय!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) धक्कादायक पराभव झाला. या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) धक्कादायक पराभव झाला. या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. धोनीच्या नेतृत्वात मिळवलेल्या त्या विजयानंतर दोन टी-20 वर्ल्ड कप, दोन 50 ओव्हरचे वर्ल्ड कप, एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अशा एकूण 6 स्पर्धा झाल्या. या 8 वर्षात आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश येत असल्यामुळे बीसीसीआय आता मोठे आणि कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, अशी वृत्त प्रसिद्ध होत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये झालेला पराभव टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागला आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो, या बदलाची सुरुवात आगामी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) बघायला मिळू शकते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतली भारताची ही पहिलीच सीरिज असेल. या सीरिजमध्ये टीम इंडियाची भिंत म्हणून ओळख असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. पुजाराऐवजी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. तसंच केएल राहुल (KL Rahul) फॉर्ममध्ये आणि फिट असेल तर त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाईल, अन्यथा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चौथ्या क्रमांकावर आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) पाचव्या क्रमांकावर खेळेल. चेतेश्वर पुजारा हा गेल्या दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. तसंच त्याच्या स्ट्राईक रेटवरही सातत्याने टीका होत आहे. विराट कोहलीनेही फायनलमधल्या पराभवानंतर अप्रत्यक्षपणे पुजारावर निशाणा साधला. प्रत्येक वेळी आऊट व्हायच्या चिंतेने खेळता येणार नाही, थोडा धोका पत्करावाच लागेल, असं कोहली म्हणाला. कोहलीच्या या वक्तव्यामुले पुजाराचं टीममधलं स्थान धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. याचसोबत टीम इंडिया ऑलराऊंडर म्हणून शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) खेळवण्याचा विचार करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ही भूमिका बजावली होती, पण त्याला संपूर्ण सामन्यात फक्त 15 ओव्हर बॉलिंग देण्यात आली, यात त्याला एकमेव विकेट मिळाली. तसंच बॅटिंगमध्येही त्याला अपयश आलं. शार्दुल ठाकूर हा इंग्लंडच्या वातावरणात बॉल स्विंगही करू शकतो, तसंच त्याची बॅटिंगही उपयोगी ठरू शकते. ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दूलने आपल्या बॅटिंगची चुणूक दाखवली. फायनलमध्ये भारताने मोहम्मद शमी (Mohammad Shami), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या तीन फास्ट बॉलरना खेळवण्याचा निर्णय घेतला होता, पण यातला एकट्या शमीनेच भेदक बॉलिंग केली. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला, त्यामुळे टीममध्ये असलेल्या मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) अंतिम-11 मध्ये खेळवलं जाऊ शकतं. मोहम्मद सिराजला खेळवायचं असेल, तर इशांत शर्माला बाहेर बसावं लागू शकतं. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. टेस्ट सीरिजमध्ये सिराज भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता.
  Published by:Shreyas
  First published: