साऊथम्पटन, 20 जून: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली, पण दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. विराट कोहलीला (Virat Kohli) एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) विराटला एलबीडब्ल्यू केलं. अंपायरने आऊट दिल्यानंतर विराटने डीआरएसही घेतला, पण त्यातही विराट आऊट असल्याचं निष्पन्न झालं. विराट कोहली 132 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला.
Kyle Jamieson gets the massive scalp of Virat Kohli!
The Indian captain is out for 44. 🇮🇳 are 149/4. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/IvsdXSZmbs pic.twitter.com/j8dJTqbaBm — ICC (@ICC) June 20, 2021
काईल जेमिसन हा आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळतो. आयपीएलमध्येही विराटने काईल जेमिसनला नेटमध्ये ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं, पण जेमिसनने विराटला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. जेमिसनच्या या रोखठोक भूमिकेमुळे अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं.
काईल जेमिसन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये आपल्याला त्रास देऊ शकतो, हे विराटला माहिती होतं, त्यामुळे त्याने जेमिसनला ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं. इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटसाठी ड्युक बॉलचा वापर केला जातो.
आयपीएलच्या लिलावामध्ये विराटच्या आरसीबीने काईल जेमिसनवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. जेमिसनला बँगलोरने तब्बल 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. काईल जेमिसनने याआधी 2019-2020 सालीही भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहली आणि टीम इंडियाला त्रास दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india, Virat kohli