मुंबई, 18 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी (World Test Championship Final) टीम इंडियाला खूशखबर मिळाली आहे. केएल राहुल (KL Rahul) हा इंग्लंड दौऱ्यासाठी पूर्णपणे फिट झाला आहे. बुधवारी तो बँगलोरवरून मुंबईला पोहोचेल. आयपीएल 2021 (IPL 2021) दरम्यान केएल राहुलचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. यानंतर कोरोनामुळे आयपीएल अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. केएल राहुलची निवड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) झाली होती, पण त्याआधी राहुलला फिट होणं गरजेचं होतं.
केएल राहुल रस्त्यामार्गे बँगलोरहून चेन्नईला जाईल. यानंतर तो मुंबईत विमानाने दाखल होईल. राहुलचा मित्र मयंक अग्रवालही (Mayank Agarwal) रस्त्यामार्गेच बँगलोरवरून चेन्नईला येईल. मुंबईमध्ये 24 मे रोजी सगळे खेळाडू बायो-बबलमध्ये दाखल होतील, त्याआधी सगळ्या खेळाडूंच्या दोन-दोन कोरोना टेस्ट होणार आहेत. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश मिळेल.
भारतीय खेळाडू हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीवरून मुंबईला चार्टर विमानाने येतील. हैदराबादवरून मोहम्मद सिराज मुंबईत येईल, तर हनुमा विहारी हा आधीच इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला आहे. चेन्नईवरून अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, मयंक अग्रवाल हे खेळाडू येतील. तर दिल्लीवरून ऋषभ पंत, शुभमन गिल, उमेश यादव, आवेश खान, अभिमन्यू इश्वरन आणि इशांत शर्मा चार्टर विमानात बसतील. चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अरझान नागवासवाला गुजरातहून मुंबईला रस्त्यामार्गे येतील.
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा
स्टॅण्डबाय
अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अरझान नागवासवाला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Kl rahul, New zealand, Team india