• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : शेवटच्या दिवशी विलियमसन होता टेन्शनमध्ये, या खेळाडूची वाटत होती भीती

WTC Final : शेवटच्या दिवशी विलियमसन होता टेन्शनमध्ये, या खेळाडूची वाटत होती भीती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताचा न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) हातून पराभव झाला. अनेकांनी सहाव्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) पहिल्या तासात गेलेल्या विकेटमुळे मॅच फिरल्याचं सांगितलं.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताचा न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) हातून पराभव झाला. अनेकांनी सहाव्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) पहिल्या तासात गेलेल्या विकेटमुळे मॅच फिरल्याचं सांगितलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने मात्र वेगळं मत व्यक्त केलं आहे. विराट आणि पुजाराची विकेट गेल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पलटवार केला, त्यामुळे आमची धाकधूक वाढली होती, असं विलियमसन म्हणाला. कोहली आणि पुजाराची विकेट गेल्यानंतरही भारत विजयाचा दावेदार होता, असं विलियमसनला वाटत होतं. शेवटच्या दिवशी भारताकडे 32 रनची आघाडी होती, तर 64 रनवर 2 विकेट गेल्या होत्या. ऋषभ पंत आणि भारतीय टीमने न्यूझीलंडच्या बॉलर्सवर आक्रमण केलं, त्यामुळे भारताच्या विजयाची शक्यताही होती, अशी प्रतिक्रिया विलियमसनने दिली. तसंच साऊथम्पटनमध्ये बॉलर्सना मदत मिळत होती, ज्यामुळे टीम इंडिया मॅचमध्ये होती, असंही विलियमसनने सांगितलं. इंडिया टुडेसोबत बोलताना विलियमसन म्हणाला, 'आमच्या डोक्यात सहाव्या दिवशी खूप काही सुरू होतं. आम्हाला जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न आम्ही केले. सुरुवातीच्या दिवसांपेक्षा अखेरचा दिवस वेगळा नव्हता. शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला विकेट घेणं चांगलं होतं, ज्यामुळे निकाल लागण्याची शक्यता वाढली. भारताने यानंतर प्रत्युत्तर म्हणून आक्रमण केलं, त्यांच्याकडेही चांगले खेळाडू होते. खेळपट्टी बॉलरना मदत करत होती.' ऋषभ पंतने (Rishabh Pant) सहाव्या दिवशी भारताने महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतरही न्यूझीलंडच्या बॉलर्सवर हल्ला केला, पण 41 रन करून तो आऊट झाला. 88 बॉलच्या या खेळीमध्ये पंतने 4 फोर लगावल्या. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळली, ही सीरिज योगायोगाने आयोजित करण्यात आली. या सीरिजमुळे आमची चांगली तयारी झाली का, याचं उत्तर देणं कठीण आहे. भारतीय टीम मजबूत आहे आणि तगडी प्रतिस्पर्धीदेखील, ज्याची अपेक्षा आम्ही केली होती,' असं वक्तव्य विलियमसनने केलं.
  Published by:Shreyas
  First published: