WTC Final : टीम इंडियाचा हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, करियरमधली सगळ्यात वाईट कामगिरी

WTC Final : टीम इंडियाचा हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, करियरमधली सगळ्यात वाईट कामगिरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताच्या बॅट्समनना चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 217 रनवर ऑल आऊट केलं.

  • Share this:

साऊथम्पटन, 21 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताच्या बॅट्समनना चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 217 रनवर ऑल आऊट केलं. यानंतर वातावरण बॉलिंगला मदत करणारं असलं तरीही भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलडने 101 रन करून दोन विकेट घेतल्या. भारताला मिळालेल्या या दोन्ही विकेट दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात आल्या. अश्विनने (Ashwin) टॉम लेथमला (Tom Latham) तर इशांतने (Ishant Sharma) डेवॉन कॉनवेला (Devon Conway) माघारी पाठवलं.

टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. त्याने आतापर्यंत 11 ओव्हरमध्ये 34 रन दिल्या, ज्यामुळे इंग्लंडला चांगली सुरुवात करता आली. 2021 हे वर्ष बुमराहसाठी फार खास ठरताना दिसत नाही. या वर्षात त्याने 4 टेस्टमध्ये 7 विकेट घेतल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही बुमराहच्या बॉलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

इंग्लंडमध्ये यशस्वी व्हायला आणि स्विंग मिळवण्यासाठी बॉल वरच्या लेन्थवर टाकणं गरजेचं आहे, पण सुरुवातीला अपयश आल्यानंतरही बुमराहने त्याची रणनिती बदलली नाही, असं लक्ष्मण म्हणाला.

जसप्रीत बुमराहने 2021 साली 4 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 105.4 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याला 7 विकेट मिळाल्या. 84 रनवर 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने टेस्ट पदार्पणानंतर पाचव्या इनिंगमध्येच 5 विकेट घेतल्या होत्या, पण यावर्षी त्याला एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट घेता आलेल्या नाहीत.

Published by: Shreyas
First published: June 21, 2021, 8:59 PM IST

ताज्या बातम्या