मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final मध्ये इशांतला खेळवायचं का सिराजला? विराटला सराव सामन्यात मिळालं उत्तर

WTC Final मध्ये इशांतला खेळवायचं का सिराजला? विराटला सराव सामन्यात मिळालं उत्तर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) तिसरा फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) खेळवायचं का इशांत शर्माला (Ishant Sharma) हा प्रश्न विराट कोहलीला (Virat Kohli) सतावत होता.

मुंबई, 14 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) तिसरा फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) खेळवायचं का इशांत शर्माला (Ishant Sharma) हा प्रश्न विराट कोहलीला (Virat Kohli) सतावत होता, पण या मुकाबल्याआधी झालेल्या सराव सामन्यात विराटला याचं उत्तर मिळालं आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या इंट्रास्क्वाड सामन्यात अनुभवी इशांत शर्मा युवा मोहम्मद सिराजवर भारी पडला, पण दोघांनीही उत्कृष्ट बॉलिंग करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं कर्णधाराला दाखवून दिलं.

सुरुवातीला फायनलमध्ये मोहम्मद सिराजला संधी दिली जाईल, तसंच इशांतला बाहेर बसावं लागेल, असं सांगितलं जात होतं, पण इशांत एवढ्या लगेच हार मानणारा नाही. भारताकडून 101 टेस्ट खेळणाऱ्या इशांतने 36 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 22 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार टीम मॅनेजमेंट फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद सिराजला खेळवण्याचा विचार करत आहे, कारण त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तसंच त्याने इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही बॅट्समनना त्रास दिला होता. आयपीएलमध्येही सिराजने धमाकेदार कामगिरी केली होती. तर दुसरीकडे इशांत शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये उत्तम प्रदर्शन केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये इशांतने 11 सामने खेळून 36 विकेट घेतल्या. इशांतने फक्त 17.36 च्या सरासरीने या विकेट मिळवल्या. एवढच नाही तर इशांतला इंग्लंडमध्ये 43 टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे जर इशांतला खेळवण्याचा निर्णय विराटने घेतला तर फार कोणाला आश्चर्य वाटणार नाही.

First published:
top videos

    Tags: Cricket, Team india, Virat kohli