मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडिया आज इंग्लंडला रवाना होणार, 104 दिवसांच्या दौऱ्यात फक्त 30 दिवसच खेळणार

टीम इंडिया आज इंग्लंडला रवाना होणार, 104 दिवसांच्या दौऱ्यात फक्त 30 दिवसच खेळणार

टीम इंडिया (Team India) बुधवारी संध्याकाळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

टीम इंडिया (Team India) बुधवारी संध्याकाळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

टीम इंडिया (Team India) बुधवारी संध्याकाळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 2 जून : टीम इंडिया (Team India) बुधवारी संध्याकाळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. शेवटची टेस्ट 14 सप्टेंबरला संपणार आहे, म्हणजेच टीम इंडिया 104 दिवस इंग्लंडमध्ये राहणार आहे. यामध्ये भारतीय टीम एकूण 6 टेस्ट म्हणजेच 30 दिवस खेळणार आहे, तर 74 दिवस टीमचा एकही सामना होणार नाही. टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी या दौऱ्याच्या वेळापत्रकावर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारतीय पुरुष टीमसोबतच महिला टीमही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर कोणताही खेळाडू हॉटेलच्या बाहेर पडू शकणार नाही. तसंच त्यांची रोज टेस्ट होणार आहे, तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 6 जूनपासून खेळाडूंचे छोटे-छोटे ग्रुप ट्रेनिंगला सुरुवात करतील. 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये होणार आहे, तर 23 जून हा रिझर्व डे असणार आहे. पाच दिवसांचा खेळ पूर्ण झाल्यानंतरही जर ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत, तर मॅच रेफ्री याचा निर्णय घेतील. जर मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या नेतृत्वात अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. हा सामना विराटने जिंकला, तर तो आयसीसी ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय कर्णधार बनेल. आतापर्यंत कपिल देव (Kapil Dev), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांना आयसीसी ट्रॉफी जिंकता आल्या आहेत. कपिल देव यांनी 1983 सालचा वर्ल्ड कप, तर धोनीने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. गांगुलीच्या नेतृत्वात भारताला 2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातली 5 टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जास्तीत जास्त 23 जूनपर्यंत चालेल. म्हणजेच 41 दिवसानंतर भारतीय टीम दुसरी टेस्ट खेळायला उतरेल. दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून, तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून, चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून आणि पाचवी टेस्ट 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय महिला टीम इंग्लंडमध्ये एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहे. अखेरची मॅच 14 जुलैला संपणार आहे, म्हणजेच भारतीय महिला टीम 42 दिवस इंग्लंडमध्ये राहिल. 10 दिवसांच्या सामने खेळून भारतीय टीम 32 दिवस मैदानाबाहेर असेल, पण हा दौरा टीमसाठी महत्त्वाचा आहे, कारण 7 वर्षानंतर महिला टीम टेस्ट मॅच खेळणार आहे. याशिवाय रमेश पोवार यांच्या रुपात टीमला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. मिताली राज वनडे आणि टेस्ट टीमची तर हरमनप्रीत कौर टी-20 टीमची कर्णधार आहे. पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये वनडे वर्ल्ड कप होणार असल्यामुळे त्याच्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
First published:

Tags: Cricket news, India vs england, New zealand, Team india

पुढील बातम्या