• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • WTC Final: ज्याच्यावर दाखवला विश्वास त्यानेच विराटला दुसऱ्यांदा दिला धोका

WTC Final: ज्याच्यावर दाखवला विश्वास त्यानेच विराटला दुसऱ्यांदा दिला धोका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडिया समोरची अडचण वाढली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसनने (Kyle Jamieson) विराटला (Virat Kohli) माघारी धाडलं आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 23 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final)  टीम इंडिया समोरची अडचण वाढली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसनने (Kyle Jamieson) विराटला (Virat Kohli) माघारी धाडलं आहे. जेमिसनने ऑफ स्टम्प बाहेर टाकलेल्या बॉलवर विराट खेळायला गेला, पण त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि विकेट कीपर बीजे वॉटलिंगने विराटचा कॅच पकडला. 29 बॉलमध्ये 13 रन करून विराट माघारी परतला. यानंतर लगेचच जेमिसनने पुजाराचीही (Cheteshwar Pujara) विकेट घेतली.  याआधी मागच्या इनिंगमध्येही जेमिसननेच विराटला आऊट केलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये जेमिसनने विराटला एलबीडब्ल्यू केलं. अंपायरने आऊट दिल्यानंतर विराटने डीआरएसही घेतला, पण त्यातही तो आऊट असल्याचं निष्पन्न झालं. पहिल्या इनिंगमध्ये विराटने 132 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली. पहिल्या इनिंगमध्येही जेमिसनने टीम इंडियाच्या 5 विकेट घेतल्या होत्या. काईल जेमिसन हा आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळतो. आयपीएलमध्येही विराटने काईल जेमिसनला नेटमध्ये ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं, पण जेमिसनने विराटला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. जेमिसनच्या या रोखठोक भूमिकेमुळे अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं. काईल जेमिसन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये आपल्याला त्रास देऊ शकतो, हे विराटला माहिती होतं, त्यामुळे त्याने जेमिसनला ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं. इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटसाठी ड्युक बॉलचा वापर केला जातो. आयपीएलच्या लिलावामध्ये विराटच्या आरसीबीने काईल जेमिसनवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. जेमिसनला बँगलोरने तब्बल 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. काईल जेमिसनने याआधी 2019-2020 सालीही भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहली आणि टीम इंडियाला त्रास दिला होता.
    Published by:Shreyas
    First published: