मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final पावसामुळे संकटात, निकाल लागला नाही तर कोणाला मिळणार गदा?

WTC Final पावसामुळे संकटात, निकाल लागला नाही तर कोणाला मिळणार गदा?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) सुरू आहे, पण पहिले तिन्ही दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) सुरू आहे, पण पहिले तिन्ही दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) सुरू आहे, पण पहिले तिन्ही दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Shreyas

साऊथम्पटन, 20 जून: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) सुरू आहे, पण पहिले तिन्ही दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पाऊस आणि खराब प्रकाशामुळे फक्त 64 ओव्हरचाच खेळ झाला. तर तिसऱ्या दिवशीही सामना अर्धा तास उशीरा म्हणजेच 3.30 वाजता सुरू झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चौथ्या दिवशीही साऊथम्पटनमध्ये पावसाची शक्यता आहे.

आयसीसीने या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे, पण तरीही सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही टीमना विजेता घोषित करण्यात येणार आहे, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या टीमना मिळणारी गदा विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) या दोन्ही कर्णधारांना देण्यात येईल, तसंच बक्षिसाची रक्कमही दोन्ही टीममध्ये समसमान वाटली जाईल.

आयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. हा मुकाबला जिंकणाऱ्या टीमला 11.72 कोटी रुपये मिळणार आहे, तर उपविजेत्या टीमला 5.85 कोटी रुपये मिळतील.

जर मॅच टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, त्यामुळे दोन्ही टीमना समसमान रक्कम दिली जाईल, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला जवळपास प्रत्येकी 8.78 कोटी रुपये मिळतील.

तिसऱ्या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाला 3.3 कोटी रुपये, चौथ्या क्रमांकावरच्या इंग्लंडला 2.5 कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरच्या पाकिस्तानला 1.5 कोटी रुपये मिळतील, तर इतर 4 टीमना प्रत्येकी 73-73 लाख रुपये देण्यात येतील.

9 टीम झाल्या होत्या सहभागी

टेस्ट क्रिकेटचा रोमांच वाढवण्यासाठी आयसीसीने 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरूवात केली होती. या स्पर्धेत एकूण 9 टीमनी सहभाग घेतला होता. प्रत्येक टीम 6-6 सीरिज खेळणार होती, यातल्या 3 सीरिज घरच्या मैदानात तर 3 सीरिज परदेशात खेळायच्या होत्या. पण कोरोनामुळे अनेक सीरिज स्थगित कराव्या लागल्या. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या आणि न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

2023 ते 2031 या कालावधीमध्ये आयसीसी ही स्पर्धा आणखी चारवेळा आयोजित करणार आहे. आयसीसी चार प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतं. यामध्ये वनडे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप यांचा समावेश आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता 2025 आणि 2029 मध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली तर आयसीसीच्या चारही स्पर्धा जिंकणारी भारतीय टीम पहिलीच ठरेल.

First published:

Tags: Cricket news, Icc, New zealand, Team india