• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : मायकल वॉनने टीम इंडियाला डिवचलं, वसीम जाफरने केली बोलती बंद

WTC Final : मायकल वॉनने टीम इंडियाला डिवचलं, वसीम जाफरने केली बोलती बंद

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या हटके ट्वीटमुळे कायमच चर्चेत असतो. वसीम जाफरने शेयर केलेले मीम्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

 • Share this:
  मुंबई, 19 जून : भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या हटके ट्वीटमुळे कायमच चर्चेत असतो. वसीम जाफरने शेयर केलेले मीम्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. वसीम जाफर हा अनेकवेळा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनवर (Michael Vaughan) निशाणा साधतो, याला बहुतेकवेळा कारण ठरतं ते मायकल वॉनचं डिवचणं. यावेळीही मायकल वॉनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवरून टीम इंडियाला डिवचलं. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा (World Test Championship Final) पहिला दिवस पावसामुळे होऊ शकला नाही. यानंतर वॉनने एक ट्वीट करत टीम इंडियाची खिल्ली उडवली. हवामानाने भारताला वाचवलं, असं म्हणत वॉनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा हॅशटॅग वापरला. मायकल वॉनच्या या ट्वीटला वसीम जाफरने प्रत्युत्तर दिलं. जाफरने लगान चित्रपटातल्या एका सीनचा फोटो शेयर केला. यामध्ये आमीर खान आपल्या साथीदारांसोबत लपून मॅच बघत आहे. बाकीच्या टीमही अशाचप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल बघत आहेत, असं जाफर म्हणाला. भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा मुकाबला साऊथम्पटनमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असला तरी आयसीसीने सहावा दिवस रिझर्व्ह ठेवला आहे. मॅचच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  Published by:Shreyas
  First published: