WTC Final : लक्ष्मणने सांगितली रहाणेची कमजोरी, सचिनच्या सल्ल्याची करून दिली आठवण

WTC Final : लक्ष्मणने सांगितली रहाणेची कमजोरी, सचिनच्या सल्ल्याची करून दिली आठवण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 217 रनवर ऑल आऊट केला. भारताकडून अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक 49 रनची खेळी केली.

  • Share this:

मुंबई, 21 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 217 रनवर ऑल आऊट केला. भारताकडून अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक 49 रनची खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 101 रन केले. रहाणेला डावखुरा फास्ट बॉलर निल वॅगनरने (Neil Wagner) माघारी पाठवलं. वॅगनरने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर रहाणे पूल करायला गेला आणि स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या टॉम लेथमने (Tom Latham) त्याचा कॅच पकडला. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) रहाणेच्या कमजोरीकडे लक्ष वेधून घेतलं. याचसोबत त्याने सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एका सल्ल्याचीही आठवण करून दिली.

रहाणेची विकेट घेण्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनची भूमिका महत्त्वाची ठरली. रहाणेला आऊट करण्याआधी विलियमसनने वॅगनरसोबत रणनिती ठरवली. रहाणे शॉर्ट पिच बॉलिंगवर चांगल्या पद्धतीने हूक आणि पूल मारत होता, पण आऊट होण्यात हेच कारण ठरलं.

'रहाणे सेट झाला होता आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता. न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमध्येही त्याच्याविरुद्ध हीच रणनिती अवलंबली गेली होती. पाचव्या बॉलपर्यंत तिकडे कोणीही फिल्डर नव्हता. यानंतर बॅकवर्ड शॉर्ट लेगलाही फिल्डर ठेवण्यात आल्या, ज्यामुळे रहाणेला बावचळत पूल शॉट मारावा लागला. रहाणेच्या शॉटमध्ये कोणताही दम नव्हता, तो स्वत: देखील यामुळे खूश नसेल,' असं लक्ष्मण म्हणाला.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लक्ष्मणने सचिनच्या सल्ल्याचीही आठवण करून दिली. 'करियरच्या सुरुवातीला मला सचिनने एक सल्ला दिला होता. जर तुला यशस्वी व्हायचं असेल, तर तुला दोन गोष्टींबाबत कळलं पाहिजे. एक तर तुझा ऑफ स्टम्प कुठे आहे ते आणि दुसरं म्हणजे बॉल अशा ठिकाणी पडला असेल जिकडे खेळायचं का नाही हे समजणं कठीण असतं, तेव्हा त्या बॉलचा सामना कसा करायचा. अशा वेळी बाऊन्सर सोडायचा का डिफेंड करायचा हे कळलं पाहिजे,' असं सचिनने मला सांगितल्याची प्रतिक्रिया लक्ष्मणने दिली.

अजिंक्य रहाणेने आपल्या 117 बॉलच्या खेळीमध्ये 5 फोर लगावल्या, तसंच त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत 61 रनची पार्टनरशीप केली. विराटनेही 132 बॉलमध्ये एका फोरच्या मदतीने 44 रन केले.

Published by: Shreyas
First published: June 21, 2021, 6:28 PM IST

ताज्या बातम्या