मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : 22 हजारांपेक्षा जास्त रन, पण जगातला बेस्ट बॅट्समन फायनलमध्ये का होतो फेल?

WTC Final : 22 हजारांपेक्षा जास्त रन, पण जगातला बेस्ट बॅट्समन फायनलमध्ये का होतो फेल?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. विराटची गणना सध्याच्या जगातल्या सर्वोत्तम खेळाडूमध्ये होते, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

पुढे वाचा ...

साऊथम्पटन, 20 जून : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. विराटची गणना सध्याच्या जगातल्या सर्वोत्तम खेळाडूमध्ये होते, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण विराटला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 44 रनच करता आले. तो पाचव्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये उतरला आहे, पण यात त्याला एकदाच अर्धशतक करण्यात आलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटने 132 बॉल खेळून 44 रन केले. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये कोहली फक्त 5 रन करून आऊट झाला. पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) विराटची विकेट घेतली. त्या सामन्यात भारताचा 180 रनने पराभव झाला होता.

2014 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराटला 77 रन करता आले होते, पण त्या सामन्यात भारताचा 6 विकेटने पराभव झाला. 2011 साली वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराट 35 रन करून आऊट झाला. तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्या सामन्यात श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव झाला होता.

2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने विजय मिळवला होता. त्या फायनलमध्ये विराटने 43 रनची खेळी केली होती.

टेस्टमध्ये 25 शतकं, वनडेत 43 शतकं

विराट कोहलीने 92 टेस्टच्या 154 इनिंगमध्ये 52 च्या सरासरीने 7,534 रन केले, यात 27 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार म्हणून विराट भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, तर जगात चौथ्या क्रमांकाचा आहे. कोहलीने कर्णधार असताना 99 इनिंगमध्ये 59 च्या सरासरीने 5,436 रन केले, यात 20 शतकं आणि 15 अर्धशतकं आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 43 शतकं आणि 12,169 रन आहेत, तर टी-20 मध्ये त्याल 28 अर्धशतकं आणि 3,159 रन करता आले.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli