• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : मैदानात उतरताच विराटने दाखवली खिलाडूवृत्ती, तुम्हीही सलाम कराल! VIDEO

WTC Final : मैदानात उतरताच विराटने दाखवली खिलाडूवृत्ती, तुम्हीही सलाम कराल! VIDEO

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समनना मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं, पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खिलाडूवृत्ती दाखवून चाहत्यांची मनं जिंकली.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समनना मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं, पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खिलाडूवृत्ती दाखवून चाहत्यांची मनं जिंकली. या ऐतिहासिक टेस्ट मॅचच्या अखेरच्या दिवशी जेव्हा विराट बॅटिंगसाठी मैदानात आला तेव्हा तो न्यूझीलंडचा विकेट कीपर बीजे वॉटलिंगजवळ (BJ Watling) गेला आणि त्याला हात मिळवला. वॉटलिंग त्याची अखेरची टेस्ट मॅच खेळत आहे. त्याच्या टेस्ट करियरमधला हा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे कोहलीने त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विराटच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे. आयसीसीनेही (ICC) विराटच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेटं करून विराटच्या खिलाडूवृत्तीला सलाम केला आहे. या सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला. दुसऱ्या इनिंगमध्ये तो 13 रन करून आऊट झाला, तर पहिल्या इनिंगमध्ये त्याला 44 रन करता आले. दोन्ही इनिंगमध्ये काईल जेमिसनने विराटची विकेट घेतली. विराट कोहली भारताकडून सर्वाधिक टेस्टमध्ये नेतृत्व करणारा खेळाडू आहे. विराटने धोनीचं हे रेकॉर्ड मोडलं आहे. धोनीने 60 सामन्यांमध्ये टीमचं नेतृत्व केलं, यातल्या 27 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 14 मॅच भारताने गमावल्या आणि 15 टेस्ट ड्रॉ झाल्या. विराटने 61 सामन्यात कॅप्टन्सी केली, यात भारताला 36 विजय, 14 पराभव आणि 10 ड्रॉ आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला, यानंतर न्यूझीलंडने 249 रन केले, ज्यामुळे त्यांना 32 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली.
  Published by:Shreyas
  First published: