WTC Final : कोहली-पुजारा खराब शॉट खेळून आऊट, चाहत्यांमध्ये संतापाची लाट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) राखीव दिवशी टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बॅटिंगसाठी मैदानात उतरले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) राखीव दिवशी टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बॅटिंगसाठी मैदानात उतरले.

  • Share this:
    साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) राखीव दिवशी टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बॅटिंगसाठी मैदानात उतरले. जर भारताच्या विजयासाठी या दोघांनाही आक्रमक खेळ करावा लागणार होता, कारण या दोन्ही खेळाडूंची गणना महान खेळाडूंमध्ये होते. पण यावेळी मात्र दोघांनी भारतीय चाहत्यांची निराशा केली. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसनने (Kyle Jamieson) पहिले विराट कोहलीची विकेट घेतली, यानंतर त्याने पुजारालाही माघारी पाठवलं. काईल जेमिसनने टाकलेले हे दोन्ही बॉल उत्कृष्ट नव्हते, पण विराट आणि पुजाराने अत्यंत खराब शॉट मारले, ज्यामुळे किवी टीमला यश मिळालं. या दोघांच्या खराब शॉट्सवर भारतीय चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. विराट कोहली 13 रनवर आऊट झाला. ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेला बॉल विराट मारायला गेला, पण त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि विकेट कीपर बीजे वॉटलिंगने सोपा कॅच पकडला. यानंतर चेतेश्वर पुजारानेही ऑफ स्टम्प बाहेरचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरने पुजाराचा कॅच पकडला. 15 रन करून पुजारा माघारी परतला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 170 रनवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडला पहिल्या इनिंगमध्ये 32 रनची आघाडी मिळाल्यामुळे त्यांना विजयासाठी 139 रनची गरज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये एकाही भारतीय बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. भारताकडून अजिंक्य रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक 49 रन केले.
    Published by:Shreyas
    First published: