• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात?

WTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात?

आयसीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या (World Test Championship Final) अंतिम मॅचमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) आमने-सामने आहेत.

 • Share this:
  साऊथम्पटन, 22 जून : आयसीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या (World Test Championship Final) अंतिम मॅचमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) आमने-सामने आहेत. ही मॅच 18 जूनला सुरू झाली आहे, पण या सामन्यात पावसामुळे सतत व्यत्यय येत आहे. मॅचच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात अंपायर्सनी खेळण्यासाठी पुरेसा प्रकाश स्टेडियममध्ये उपलब्ध नसल्याने खेळ थांबवला होता, पण अंपार्यसनी (Umpire) हा मैदानातील प्रकाश मोजण्यासाठी कुठलं उपकरण वापरलं? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुम्ही चकित व्हाल. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीत देणार आहोत. टेस्ट क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे आणि अपुऱ्या प्रकाशामुळे टेस्ट मॅच संपवण्यासंबंधी निर्णयही शेकडो वर्षांपासून घेतला जात आहे. मैदानावर उपलब्ध असलेला प्रकाश क्रिकेट खेळण्यासाठी अपुरा आहे (Bad Light Conditions) असं अंपायर्सना वाटलं तर खेळ थांबवण्याचा अधिकार त्यांना आहे. क्रिकेटचा लाल चामड्याचा बॉल (Red Leather Ball) हा खूप कडक असतो त्यामुळे जर अपुऱ्या प्रकाशात खेळलं तर खेळाडूंना इजा होण्याची दाट शक्यता असते. तसंच कृत्रिम लाईट्सच्या (Artificial Lights) प्रकाशात लाल रंगाचा बॉल नीट दिसत नाही, त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिनेच हा निर्णय घेतला जातो. याच कारणासाठी डे-नाईट टेस्टमध्ये गुलाबी रंगाचा बॉल वापरला जातो. डब्ल्युटीसीच्या अंतिम मॅचच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात मैदानावर प्रकाशा पुरेसा नाही, असं अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गूच यांना वाटलं त्यामुळे त्यांनी त्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पण सामान्यपणे क्रिकेटरसिकाच्या मनात विचार येतो मैदानात प्रकाश किती आहे, हे मोजतात तरी नक्की कसं? अंपायर्स दोन्ही बाजूच्या स्टंप्सवर एक फॅन्सी उपकरण धरतात. त्याच्या एका बाजूला लाईट सेन्सर (Light Sensor) असतो तर दुसऱ्या बाजूला त्यांच रिडिंग बघता येतं. या उपकरणाचं नाव आहे लाईट मीटर (Light Meter). लाईट मीटरवरील प्रकाशाच्या रिडिंगवरून अंपायर निर्णय घेतात. मैदानातील अपुऱ्या प्रकाशाबद्दल असा आहे नियम अर्थात हा निर्णय घेताना अंपार्यसना Marylebone Cricket Club (MCC) म्हणजे मेरिलीबोन क्रिकेट क्लबच्या मॅन्युअलमधील नियमांना अनुसरून काम करावं लागतं. या मॅन्युअलमधील 3.6.3 या नियमाअंतर्गत मैदानातील प्रकाश मोजण्यासाठी लाईट मीटर वापरण्याबद्दल स्पष्टता दिली आहे. या नियमात लाइट मीटरच्या वापराबद्द्ल असं म्हटलंय: 'अंपायर्सने लाईट मीटरच्या रिडिंगचा (Light Meter Reading) विचार या अनुषंगाने करावा: a) मॅचमध्ये कोणत्याही वेळी मैदानातील प्रकाश एकदम कमी झाला असं वाटलं किंवा एखाद्या वेळी खेळ सुरू करताना पुन्हा आवश्यक तेवढा प्रकाश आहे का हे बघण्यासाठी अंपायर्सनी लाईट मीटरचा वापर करावा. b) एखादी मॅच किंवा सीरिज किंवा इव्हेंट थांबवण्यासंबंधी निर्णय घेताना बेंचमार्क म्हणून या लाईट मीटर रिडिंगचा वापर अंपायर करू शकतात.' इंग्लंडमधील साउथम्पटन इथं ही मॅच सुरू आहे. या काळात तिकडे कधी कडक ऊन तर कधी एकदम पाऊस पडू शकतो. इथं खेळल्या जाणाऱ्या बहुतांश टेस्ट मॅचमध्ये (Test Matches) हवामानामुळे विघ्न येतंच. 2010 पूर्वी अंपायर्स बॅट्समनला प्रकाश कितपत आहे, खेळण्यासाठी योग्य आहे का, असं विचारत आणि त्यानंतर खेळ थांबवण्यासंबंधी निर्णय जाहीर करत. पण जर बॅट्समनच्या टीमसाठी मॅचमधली परिस्थिती चांगली नसली, तर खेळ थांबवण्याची आयती संधी त्याला उपलब्ध होत होती. त्यामुळे लाईट मीटर हे उपकरण वापरायला सुरूवात झाली. एमसीसीच्या नियमानुसार जर लाईट मीटरने दिलेल्या एखाद्या रिडिंगच्या वेळी मैदानात खूपच कमी प्रकाश आहे, असं अंपायर्सना वाटलं तर उर्वरित मॅचमध्ये ते रिडिंग बेंचमार्क (Reading Benchmark) म्हणून वापरतात. म्हणजे त्या रिडिंगच्या आधारे प्रकाश किती असला पाहिजे हे ठरवलं जातं. त्याहून अधिक प्रकाश असेल आणि खेळण्यास योग्य असेल तर खेळ होतो पण त्याहून प्रकाश कमी झाली तर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही अंपायर्सनी लाईट मीटरच्या आधारेच खेळ थांबवल्याचा निर्णय घेतला होता.
  First published: