• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : आणखी एका फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन फेल, 15 विकेट गेल्या पण...

WTC Final : आणखी एका फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन फेल, 15 विकेट गेल्या पण...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारतीय बॅट्समन पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. सहाव्या दिवशी लंचपर्यंत भारताचा स्कोअर 130 रनवर 5 विकेट असा झाला होता.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारतीय बॅट्समन पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. सहाव्या दिवशी लंचपर्यंत भारताचा स्कोअर 130 रनवर 5 विकेट असा झाला होता. तसंच टीमला 98 रनची आघाडी मिळाली होती. राखीव दिवसाच्या पहिल्या सत्रामध्येच भारताने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे लवकर आऊट झाले. पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडियाचा 217 रनवर ऑल आऊट झाला होता, तर न्यूझीलंडने 249 रन केल्यामुळे त्यांना 32 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली. मॅचच्या सहाव्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 2 विकेट गमावून केली होती, पण सुरुवातीलाच काईल जेमिसनने (Kyle Jamieson) विराटला (Virat Kohli) 13 रनवर आऊट केलं. जेमिसनने कोहलीला 3 वेळा आऊट केलं, त्याला जेमिसनविरुद्ध 84 बॉलमध्ये 30 रन करता आले. आयपीएलमध्ये जेमिसन विराटच्या आरसीबीकडून खेळतो. पुजाराची खराब कामगिरी सुरूच टीम इंडियाचा सगळ्यात विश्वासू बॅट्समन अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडून (Cheteshwar Pujara) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 54 बॉलमध्ये 8 रन केले, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 80 बॉलमध्ये 15 रन करता आले, म्हणजेच दोन्ही इनिंगमध्ये त्याला 20 रनचा आकडाही पार करता आला नाही. पुजाराला दुसऱ्या इनिंगमध्ये जेमिसनने आऊट केलं. जेमिसनविरुद्ध पुजाराला 44 बॉलमध्ये फक्त 1 रन करता आली. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक 49 रन केले होते, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 15 रनच करता आले. या सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या लंचपर्यंत टीम इंडियाने 15 विकेट गमावल्या, पण एकाही बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. फायनलमध्ये अपयश आयसीसीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धही भारताची बॅटिंग गडगडली होती.
  Published by:Shreyas
  First published: