WTC Final : रहाणेने 'खराब' शॉट का खेळला? गावसकरांनी सांगितलं कारण

WTC Final : रहाणेने 'खराब' शॉट का खेळला? गावसकरांनी सांगितलं कारण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारतीय टीमला बॅकफूटवर नेलं आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) खेळलेल्या खराब शॉटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रहाणेने असा शॉट का मारला याचं कारण सांगितलं आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 21 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारतीय टीमला बॅकफूटवर नेलं आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा 217 रनवर ऑल आऊट झाला. भारताच्या जवळपास प्रत्येक खेळाडूला चांगली सुरुवात मिळाली, पण कोणालाही मोठा स्कोअर करता आला नाही. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीमचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू ठरला. 117 बॉलमध्ये 49 रन करून अजिंक्य माघारी परतला. त्याच्या या खेळीमध्ये 5 फोरचा समावेश होता. नील वॅगनरने अजिंक्यची विकेट घेतली. वॅगनरने (Neil Wagner) टाकलेल्या शॉर्ट पिच बॉलवर रहाणेने पूल मारण्याचा प्रयत्न केला, पण स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या टॉम लेथमने (Tom Latham) अजिंक्यचा कॅच पकडला. अजिंक्यने मारलेला हा शॉट खराब असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली, तसंच मोकाच्या क्षणी रहाणेने चुकीचा शॉट मारल्याचीही टीका त्याच्यावर झाली.

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी अजिंक्य रहाणेच्या या शॉटवर प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेला त्याचं अर्धशतक लवकर पूर्ण करायचं होतं, त्यामुळे त्याने असा शॉट मारला असेल, याशिवाय दुसरं कारण असू शकत नाही, असं गावसकर म्हणाले. आऊट व्हायच्या आधीच्या बॉलवरही रहाणेला त्याचा शॉट नीट मारता आलं नसल्याचं गावसकरांनी सांगितलं.

या मुकाबल्याच्या दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आलेल्या रहाणेला सुरुवातीला काही काळ संघर्ष करावा लागला, पण त्यानंतर मात्र त्याने काही उत्कृष्ट फटके मारले. रहाणेबरोबरच रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली यांना चांगली सुरुवात मिळाली होती. रोहित 34 रनवर, शुभमन गिल 28 रनवर आणि विराट 49 रनवर आऊट झाले.

Published by: Shreyas
First published: June 21, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या