WTC Final : या खेळाडूंना संधी दे, गावसकरांचा विराटला दिला विजयाचा मंत्र

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) 18 जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) 18 जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) 18 जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे. साऊथम्पटनच्या गरमीमध्ये विराटने अश्विन (Ashwin) आणि जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांना खेळवावं, कारण खेळपट्टी हळू हळू सुकेल आणि मग स्पिनरना मदत मिळेल, असं गावसकर म्हणाले आहेत. गावसकर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कॉमेंट्री करणार आहेत. 'साऊथम्पटनमध्ये मागच्या काही दिवसांपासून गरमी आहे, त्यामुळे खेळपट्टी सुकली असेल आणि स्पिनरना मदत मिळेल, त्यामुळे अश्विन आणि जडेजा दोघंही खेळू शकतात. हे दोन्ही खेळाडू टीमला बॅटिंगही देतात आणि बॉलिंगमध्येही संतुलन येतं. इंग्लंडविरुद्ध नंतर होणाऱ्या सीरिजमध्ये मात्र सगळं काही खेळपट्टी आणि हवामानावर अवलंबून आहे,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली. इंग्लंडविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढलेला असेल, पण भारताने सराव सामना खेळला नसला तरी त्यांची तयारीही मजबूत आहे, असं गावसकरांना वाटतं. 'हल्ली प्रत्येक दौऱ्यात एक-दोन सराव सामने असतात, पण भारतीय खेळाडू आपापसात सराव सामना खेळले. टीममध्ये युवा खेळाडूंचं मिश्रण आहे. तसंच अनेक खेळाडू बरेच वेळा इंग्लंड दौऱ्यावर गेले आहेत, त्यामुळे तिथल्या परिस्थितीची त्यांना माहिती आहे,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं. 'वनडे क्रिकेटच्या प्रभावामुळे अनेक बॅट्समन उसळणाऱ्या बॉलवर खेळण्यासाठी जातात, पण बॉल स्विंग झाला तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात. इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होतो, त्यामुळे शरिराच्या जवळ तुम्हाला खेळावं लागतं,' असं गावसकर म्हणाले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 2019 वर्ल्ड कपप्रमाणेच खेळेल, असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने 5 शतकं केली होती. यातलं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं शतक याच मैदानातलं होतं.
    Published by:Shreyas
    First published: