WTC Final: ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा

WTC Final: ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आयसीसीच्या नियमांवर नाराज झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) ड्रॉ झाली तर आयसीसीने विजेता शोधला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

  • Share this:

साऊथम्पटन, 22 जून: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आयसीसीच्या नियमांवर नाराज झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) ड्रॉ झाली तर आयसीसीने विजेता शोधला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. या सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. तर दुसऱ्या आण तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे ओव्हर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तसंच पाचव्या दिवशीही पावसामुळे सामना एक तास उशीरा सुरू झाला. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असला तरी आता मॅच ड्रॉ होण्याचीच शक्यता जास्त आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा हा सामना ड्रॉ झाला तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल, तसंच पुरस्काराची रक्कमही समसमान वाटण्यात येईल, असं आयसीसीने सांगितलं. असं असलं तरी गावसकर यांनी विजेती टीम घोषित करण्यासाठी एखादा फॉर्म्युला गरजेचा असल्याचं मत आज तकशी बोलताना मांडलं.

'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ड्रॉ होईल, असं वाटत आहे. पहिल्यांदाच एखाद्या फायनलमध्ये संयुक्त विजेते घोषित करण्यात येतील. दोन दिवसांमध्ये तीन इनिंग संपणं शक्य नाही. आतापर्यंत 141 ओव्हरचा सामना झाला आणि 196 ओव्हर बाकी आहेत. आयसीसीला टेनिस आणि फूटबॉलप्रमाणे टायब्रेकरच्या माध्यमातून विजेत्याची घोषणा करण्याची गरज आहे. फूटबॉलमध्ये पेनल्टी शूटआऊट असतं. टेनिसमध्ये पाच सेट आणि टाय ब्रेकर असतो. आयसीसीनेही अशाचप्रकारे काहीतरी शोधलं पाहिजे,' असं गावसकर म्हणाले.

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकल्यानंतर भारताला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 101 रन केले. दिवसच्या अखेरच्या काही ओव्हरमध्ये भारताने टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवेला माघारी धाडलं. लेथमला अश्विनने तर कॉनवेला इशांत शर्माने आऊट केलं.

Published by: Shreyas
First published: June 22, 2021, 4:56 PM IST

ताज्या बातम्या