मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : श्रीलंकेच्या चाहत्याने उडवली पुजाराची खिल्ली, भारतीयांनी केली बोलती बंद

WTC Final : श्रीलंकेच्या चाहत्याने उडवली पुजाराची खिल्ली, भारतीयांनी केली बोलती बंद

टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) भारताच्या बॅटिंगची भिंत म्हणून ओळखली जाते. धैर्याने मैदानात उभं राहून मोठी इनिंग खेळण्यासाठी पुजारा ओळखला जातो. पुजाराने अनेकवेळा टीमला कठीण परिस्थितीमधून बाहेर काढलं आहे, पण धीम्या बॅटिंगमुळे त्याच्यावर टीकाही होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

साऊथम्पटन, 20 जून : टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) भारताच्या बॅटिंगची भिंत म्हणून ओळखली जाते. धैर्याने मैदानात उभं राहून मोठी इनिंग खेळण्यासाठी पुजारा ओळखला जातो. पुजाराने अनेकवेळा टीमला कठीण परिस्थितीमधून बाहेर काढलं आहे, पण धीम्या बॅटिंगमुळे त्याच्यावर टीकाही होते. लोकांनी टीका केली तरी पुजाराच्या बॅटिंगमध्ये काहीही फरक पडला नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhaman Gill) भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 62 रनची पार्टनरशीप झाली, पण जेमिसनने (Kyle Jamieson) रोहित-शुभमनची जोडी तोडली, यानंतर पुजारा मैदानात आला. या सामन्यातही पुजाराला त्याच्या बॅटिंगमुळे ट्रोल व्हावं लागलं. एका श्रीलंकेच्या चाहत्याने पुजाराच्या बॅटिंगवर निशाणा साधला, पण भारतीयांनी त्याची बोलती बंद केली.

जेमिसनने रोहितची विकेट घेतल्यावर गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या पुजाराने पहिली रन काढण्यासाठी 36 बॉल घेतले. यानंतर श्रीलंकेच्या चाहत्याने पुजाराची खिल्ली उडवली. 54 बॉलमध्ये 8 रन करून पुजारा आऊट झाला.

श्रीलंकन युजरने ऍडलेड टेस्टमध्ये झालेल्या भारताच्या 36 रन ऑल आऊटची आठवण करून दिली. डॅनियल अलेक्झांडरने लिहिलं, 'पुजाराने 36 व्या बॉलवर पहिली रन काढून ऍडलेड टेस्टच्या 36 रन ऑल आऊटला श्रद्धांजली दिली.' या ट्वीटवर भारतीय चाहते भडकले आणि त्यांनी अलेक्झांडरला श्रीलंका टीमची आठवण करून दिली.

एका चाहत्याने भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी बी टीम पाठवत आहे, अशी आठवण करून दिली, तर दुसऱ्याने टेस्ट क्रमवारीत श्रीलंका कितव्या क्रमांकावर आहे? असा प्रश्न विचारला.

First published:

Tags: New zealand, Pujara, Team india