मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : भारत-न्यूझीलंडच्या 5 खेळाडूंमध्ये खास नातं, 13 वर्षांपासून करतंय पाठलाग

WTC Final : भारत-न्यूझीलंडच्या 5 खेळाडूंमध्ये खास नातं, 13 वर्षांपासून करतंय पाठलाग

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याच्यासाठी हा मुकाबला महत्त्वाचा आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

साऊथम्पटन, 8 जून : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याच्यासाठी हा मुकाबला महत्त्वाचा आहे. दोन्ही कर्णधारांचा आयसीसीच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. आयसीसीने टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात केली होती. 9 टीममध्ये ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवली गेली.

फायनलमध्ये टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहली आणि डावखुरा स्पिनर रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) खेळणं निश्चित आहे. जडेजा खालच्या फळीत उत्कृष्ट बॅटिंग करतो. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसन, फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) खेळतील. या पाचही खेळाडूंमध्ये एक खास नातं आहे.

विराट, जडेजा, विलियमसन, बोल्ट आणि साऊदी हे पाच खेळाडू 2008 साली अंडर-19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्या मॅचमध्येही विराटकडे टीम इंडियाचं आणि विलियमसनकडे न्यूझीलंडचं नेतृत्व होतं.

भारताने हा सामना तीन विकेटने जिंकला होता. न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 205 रन केले. ओपनिंगला बॅटिंग केलेल्या केन विलियमसनने 37 रनची खेळी केली, त्याला विराटने आऊट केलं. या सामन्यात कोहलीला 2 विकेट मिळाल्या होत्या, तर जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं होतं.

पावसामुळे टीम इंडियाला या सामन्यात 43 ओव्हरमध्ये 191 रनचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 41.3 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून पूर्ण केलं. विराट कोहलीला 43 रन करता आले, केन विलियमसनने त्याचा कॅच पकडला. तर जडेजा एक रन करून आऊट झाला. न्यूझीलंडकडू टीम साऊदीने 4 आणि ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली. त्या वर्ल्ड कपमध्ये पुढे भारताने ट्रॉफीही जिंकली होती. फायनलमध्ये भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेचा 12 रनने पराभव केला होता.

अंडर-19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये खेळलेले हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत आहेत. या सगळ्यांकडे 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. विराटने एकूण 435, जडेजाने 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर साऊदीने 304, विलियमसनने 302 आणि बोल्टने 198 मॅच खेळल्या.

कर्णधार म्हणून केन विलियमसन (Kane Williamson) याच्यापेक्षा विराटची कामगिरी सरस झाली आहे. विराटने 22 इनिंगमध्ये 877 रन केले, त्याची सरासरी 44 ची आहे, यात 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर केन विलियमसनने 14 इनिंगमध्ये 57 च्या सरासरीने 817 रन केले. विलियमसनला या स्पर्धेत 3 शतकं आणि एक अर्धशतक करता आलं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 185 मॅच झाल्या, यातल्या 82 मॅच भारताने जिंकल्या, तर न्यूझीलंडला 69 मॅच जिंकता आल्या. या दोन्ही टीममध्ये 59 टेस्ट झाल्या, त्यापैकी भारताने 21 आणि न्यूझीलंडने 12 टेस्ट जिंकल्या. 110 वनडेमध्ये भारताला 55 आणि न्यूझीलंडला 49 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 16 टी-20 मध्ये भारताने 6 आणि न्यूझीलंडने 8 मुकाबले जिंकले.

First published:

Tags: Cricket, New zealand, Team india