• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : पहिल्या बॅटिंगमुळे भारताचा फायदा होणार का नुकसान? पाहा साऊथम्पटनचं रेकॉर्ड

WTC Final : पहिल्या बॅटिंगमुळे भारताचा फायदा होणार का नुकसान? पाहा साऊथम्पटनचं रेकॉर्ड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले भारताला (India vs New Zealand) बॅटिंगसाठी बोलावलं.

 • Share this:
  साऊथम्पटन, 19 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले भारताला (India vs New Zealand) बॅटिंगसाठी बोलावलं. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तसंच इथल्या ढगाळ वातावरणामुळे आणि खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळे विलियमसनने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही आपण टॉस जिंकला असतो तर बॉलिंगच केली असती, अशी प्रतिक्रिया दिली. या सामन्यात दोन्ही कर्णधारांना पहिले बॉलिंग करायचीच इच्छा होती, पण साऊथम्पटनचं रेकॉर्ड मात्र वेगळंच आहे. आतापर्यंत या मैदानात 6 टेस्ट झाल्या आहेत. यापैकी 2 मॅच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या आहेत, तर 3 सामने ड्रॉ झाले आणि दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमला फक्त एकच सामना जिंकता आला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या इनिंगमध्ये भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रोहित शर्मा 34 रनवर तर शुभमन गिल 28 रनवर माघारी परतले. रोहितला काईल जेमिसनने तर शुभमन गिलला निल वॅगनरने माघारी पाठवलं. या दोन्ही ओपनरमध्ये 63 रनची पार्टनरशीप झाली. साऊथम्पटनमध्ये आतापर्यंत झालेल्या 6 टेस्टमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत इंग्लंडने दोन्ही टेस्ट जिंकल्या. इंग्लंडने हे दोन्ही विजय भारताविरुद्धच मिळवले. इंग्लंडने भारताला या मैदानात 266 आणि 60 रनने हरवलं. तर एका सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 4 विकेटने पराभव केला. आयसीसीकडून पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टेस्ट क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी आयसीसीने या स्पर्धेचं आयोजन केलं. 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने केलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे. भारतीय टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडची टीम टॉम लेथम, डेवॉन कॉनवे, केन विलियमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट
  Published by:Shreyas
  First published: