• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : न्यूझीलंडप्रमाणे भारतीय बॉलरना यश का मिळालं नाही? समोर आली कमजोरी

WTC Final : न्यूझीलंडप्रमाणे भारतीय बॉलरना यश का मिळालं नाही? समोर आली कमजोरी

न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (India vs New Zealand) बॅकफूटवर टाकलं आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 21 जून : न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (India vs New Zealand) बॅकफूटवर टाकलं आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी किवी टीमने भारताचा 217 रनवर ऑल आऊट केला. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. जेमिसनसोबत न्यूझीलंडच्या बाकीच्या फास्ट बॉलरनीही बॉल स्विंग केला, पण भारतीय बॉलरना बॉल स्विंग करायला जमलं नाही. दिवसाच्या शेवटी न्यूझीलंडचा स्कोअर 101/2 एवढा आहे. भारताकडून आर.अश्विनला (R Ashwin) पहिली आणि इशांत शर्माला (Ishant Sharma) दुसरी विकेट मिळाली. न्यूझीलंडची टीम तिसऱ्या दिवसाअखेरीस 116 रननी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी साऊथम्पटनमध्ये उन्ह पडल्यामुळे बॅटिंग सोपी झाल्याचं मत काहींनी व्यक्त केलं, पण न्यूझीलंडचे माजी फास्ट बॉलर सायमन डूल (Simon Doull) यांनी भारतीय बॉलर्सची कमजोरी सांगितली. भारतीय बॉलर हे स्विंग बॉलर नसून ते सीम बॉलर आहेत. भारताला इशांत शर्माऐवजी (Ishant Sharma) मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) खेळवायची संधी होती, पण त्यांनी अनुभवी इशांत शर्मावर विश्वास दाखवला. इशांत, बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) बॉल स्विंग करण्यापेक्षा पिचच्या मदतीने बॉल सीम करतात, असं सायमन डूल म्हणाले. तिसऱ्या दिवशी मोहम्मद शमीने चांगली बॉलिंग टाकली पण तो कमनशिबी ठरला. तर जसप्रीत बुमराहने निराशाजनक कामगिरी केली. साऊथम्पटनमधल्या मदत करणाऱ्या वातावरणात भारतीय बॉलरनी चांगली स्विंग बॉलिंग केली नसल्याचं मत सायमन डूल यांनी मांडलं. न्यूझीलंडने ज्याप्रमाणे दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बॉलिंग केली, तशीच सातत्य नसलेली बॉलिंग भारताने केल्याचं सायमन डूल क्रिकबझशी बोलताना म्हणाले. भारतीय टीमला इंग्लंडमध्ये सरावाची फार संधी मिळाली नाही, हे कारण असू शकत नाही. इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडच्या बॉलरनाही सराव मिळाला नव्हता. न्यूझीलंडची टीम पहिल्या सामन्यात भारताप्रमाणेच तयारी करून गेली होती. किवी टीमनेही इन्ट्रा स्क्वॉड मॅच खेळली होती, पण लॉर्ड्सवर झालेल्या त्या सामन्यात टीम साऊदीने उत्कृष्ट बॉलिंग केली, तसंच डेवॉन कॉनवेने 10 दिवस नेटमध्ये सराव केल्यानंतर आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये द्विशतक केलं. भारतालाही अशाचप्रकारे सरावाची संधी मिळाली होती. मागच्या 10-12 दिवसांमध्ये त्यांनी सरावात जेवढी गरज आहे, तेवढी बॉलिंग नक्कीच केली असेल, अशी प्रतिक्रिया सायमन डूल यांनी दिली.
  Published by:Shreyas
  First published: