मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final आधी माईंड गेम सुरू, रोहितवर 'दबाव' वाढवण्याची किवी रणनिती

WTC Final आधी माईंड गेम सुरू, रोहितवर 'दबाव' वाढवण्याची किवी रणनिती

मार्क वूडच्या सापळ्यात अडकला रोहित

मार्क वूडच्या सापळ्यात अडकला रोहित

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या टीमचे माईंड गेम्स सुरू झाले आहेत.

मुंबई, 14 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या टीमचे माईंड गेम्स सुरू झाले आहेत. किवींचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याने रोहित शर्माला (Rohit Sharma) या सामन्यात स्विंग बॉलिंग खेळताना त्रास होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. साऊथम्पटनच्या मैदानाचे पिच क्युरेटर सायमन ली यांनी खेळपट्टीवर बाऊन्स आणि वेग असेल, असं स्पष्ट केलं होतं, त्यानंतर स्टायरिस याने यामुळे रोहितला त्रास होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम गेम प्लानमध्ये बोलताना स्टायरिस म्हणाला, 'या गोष्टी खेळपट्टीवर अवलंबून आहेत. जर बॉल स्विंग झाला तर रोहितला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इनिंगच्या सुरुवातीला रोहितचे पाय फार चालत नाहीत. त्यामुळे बॉल स्विंग झाला तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यूझीलंडची फास्ट बॉलिंग मजबूत आहे. निल वॅगनरची भूमिका महत्त्वाची आहे.'

'न्यूझीलंडच्या फास्ट बॉलिंगमध्ये काहीही लपलेलं नाही. साऊदी आणि बोल्टसोबत काईल जेमिसन किंवा कॉलीन डि ग्रॅण्डहोम तिसरा फास्ट बॉलर असेल. 22 ते 28 व्या ओव्हरपर्यंत ते बॉलिंग करतील, यानंतर निल वॅनगर येईल. दुसरा नवा बॉल मिळेपर्यंत वॅगनर मधल्या ओव्हरमध्ये विराट कोहलीसारख्या खेळाडूची विकेट घेण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे,' असं स्टायरिस म्हणाला.

फायनल सामन्याआधी भारतापेक्षा न्यूझीलंडला तयारीसाठी चांगला वेळ मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा 1-0 ने विजय मिळवला, त्यामुळे किवी टीमचा विश्वास उंचावला असेल.

दुसरीकडे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने कोहलीला सल्ला दिला आहे. 'कोहलीला क्रीजवर सेट होण्यासाठी स्वत:ला वेळ द्यावा लागेल. 2018 साली इंग्लंड दौऱ्यात त्याने जे केलं होतं, तसंच त्याला पुन्हा करावं लागेल. त्या दौऱ्यात विराटने बरीच शतकं केली होती. कारण 2014 सालच्या दौऱ्याच्या तुलनेत विराट 2018 साली चांगला तयार झाला होता. आता मात्र न्यूझीलंडचं सध्याचं बॉलिंग आक्रमण त्याला नक्कीच आव्हान देईल, कारण त्यांच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे,' असं पार्थिव पटेल म्हणाला.

First published:
top videos

    Tags: Cricket, New zealand, Rohit sharma, Team india