WTC Final : क्रिकेटच्या देवाची भविष्यवाणी, सांगितलं कोण जिंकणार महामुकाबला

WTC Final : क्रिकेटच्या देवाची भविष्यवाणी, सांगितलं कोण जिंकणार महामुकाबला

जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत (World Test Championship Final) भविष्यावाणी केली आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये हा महामुकाबला होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत (World Test Championship Final) भविष्यावाणी केली आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये हा महामुकाबला होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचं मत सचिन तेंडुलकरने मांडलं आहे. न्यूझीलंडची टीम आधीच इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळली आहे आणि या सीरिजमध्ये त्यांचा 1-0 ने विजय झाला, त्यामुळे तिथल्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा अंदाज किवी टीमला आला आहे. दुसरीकडे भारतीय टीमला मात्र सरावाला फार वेळ मिळाला नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमने फक्त एक इंट्रा स्क्वाड मॅच खेळली आहे.

टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सचिन म्हणाला, 'या कारणामुळे न्यूझीलंडला थोडा फायदा आहे, कारण त्यांनी इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळली आहे. तर भारताला फक्त एक सराव सामना खेळता आला. पण विराटची टीम तयार असेल, कारण टीममधला प्रत्येक जण याआधी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळला आहे. ज्यात इंडिया-एचाही समावेश आहे. त्यामुळे कोणताच खेळाडू इंग्लंडमधली परिस्थिती माहिती नाही असा नाही.'

तसंच सचिनने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजवरही आक्षेप घेतले. 'दोन टेस्ट मॅचची ही सीरिज फायनलनंतर खेळवली गेली पाहिजे होती, कारण या सीरिजमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काहीही फरक पडणार नव्हता. इंग्लंडने टेस्ट सीरिज खेळवून न्यूझीलंडला तयारी करण्याची संधी दिली,' असं वक्तव्य सचिनने केलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये सातत्याचा अभाव राहिला, ज्याचा विपरित परिणाम झाल्याचं सचिनला वाटतं. 'कोरोना महामारी आणि अन्य आव्हानांमुळे बरेच ब्रेक घ्यावे लागले. ज्यामुळे फायनलसाठीचा उत्साह गायब आहे. जेव्हा एखादी स्पर्धा ब्रेकशिवाय होते, 50 ओव्हरचा वर्ल्ड कप किंवा टी-20 वर्ल्ड कप तेव्हा त्यात सातत्य असतं. या स्पर्धेसाठी वातावरण निर्मिती होते, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये गायब आहे,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या