WTC Final : विराटकडे बघून रोहितने दिली अशी रिएक्शन, तुम्हीही पोट धरून हसाल, VIDEO

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात कायमच ऍक्टिव्ह असतो. आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा तो भरपूर प्रयत्न करतो. साऊथम्पटनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) विराट सहकाऱ्यांचं मनोबल वाढवत आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात कायमच ऍक्टिव्ह असतो. आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा तो भरपूर प्रयत्न करतो. साऊथम्पटनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) विराट सहकाऱ्यांचं मनोबल वाढवत आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 22 जून : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात कायमच ऍक्टिव्ह असतो. आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा तो भरपूर प्रयत्न करतो. साऊथम्पटनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) विराट सहकाऱ्यांचं मनोबल वाढवत आहे. विराट कोहलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराटच्या बाजूला उभ्या असलेल्या रोहितची (Rohit Sharma) रिऍक्शन बघण्यासारखी आहे. या व्हिडिओमध्ये विराटच्या बाजूलाच रोहित शर्मा स्लिपमध्ये उभा आहे. थंडीमुळे विराट कोहली आपले दोन्ही हात एकमेकांवर रगडत आहे, हे पाहून रोहितने विराटकडे बघून इशारा केला, यानंतर दोघं फिल्डिंगसाठी उभे राहिले. एका चाहत्याने हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत 13 हजारांपेक्षा जास्त जणांनी तो बघितला, तसंच 630 पेक्षा जास्त जणांनी रिट्विट केला. विराटने या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 44 रन केले तर रोहित 34 रन करून आऊट झाला. भारताचा पहिल्या इनिंगमध्ये 217 रनवर ऑल आऊट झाला. पावसामुळे या सामन्याचा पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, तर उरलेल्या दोन दिवसात खराब प्रकाशामुळे दिवसाच्या ठरलेल्या ओव्हर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. एवढा खेळ फुकट गेल्यामुळे बुधवारी राखीव दिवशी उरलेल्या ओव्हर टाकल्या जातील.
    Published by:Shreyas
    First published: