WTC Final मध्ये वेगळाच 'खेळ होणार', विराट-केन चिंतेत

WTC Final मध्ये वेगळाच 'खेळ होणार', विराट-केन चिंतेत

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. साऊथम्पटनमध्ये हा महामुकाबला रंगणार आहे, पण इथल्या हवामानामुळे संपूर्ण खेळाचा खेळ-खंडोबा होऊ शकतो.

  • Share this:

साऊथम्पटन, 15 जून: भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. साऊथम्पटनमध्ये हा महामुकाबला रंगणार आहे, पण इथल्या हवामानामुळे संपूर्ण खेळाचा खेळ-खंडोबा होऊ शकतो. कारण हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे साऊथम्पटनमध्ये (Southampton Weather) पाचही दिवस पाऊस पडणार आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने टेस्ट मॅचच्या पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज सांगणारा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेच्या फायनलसाठी एक रिझर्व्ह डे असतो. पावसामुळे फायनलमध्ये व्यत्यय आला तर या रिझर्व्ह डेच्या दिवशी सामना खेळवला जातो. त्याप्रमाणे 23 जूनलाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. सुरुवातीचे 5 दिवस जर पाऊस पडला आणि मॅचचा निकाल लागला नाही, तर उरलेल्या ओव्हर सहाव्या दिवशी खेळवल्या जातील, पण याबाबतचा निर्णय मॅच रेफ्री घेणार आहे. या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला असला तरी सगळे सहा दिवस साऊथम्पटनमध्ये 70-80 टक्के पावसाची शक्यता आहे.

साऊथम्पटनमध्ये पाऊस पडला तर त्याचा फायदा न्यूझीलंडच्या बॉलरना होऊ शकतो, कारण साऊदी, बोल्ट, वॅगनर आणि जेमिसन या स्विंग बॉलरना पाऊस पडल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आणखी स्विंग मिळेल. तसंच साऊथम्पटनच्या खेळपट्टीवर वेग आणि बाऊन्स असेल, असं पिच क्युरेटरने आधीच स्पष्ट केलं आहे. साऊथम्पटनमध्ये मॅचचे सगळे दिवस पावसाचा अंदाज असेल, तर विराट कोहलीला चार फास्ट बॉलर आणि एक स्पिनर घेऊन खेळावं लागू शकतं, मग अश्विन किंवा जडेजा यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागेल.

ICC WTC Final weather forecast: Bad news for fans, rain to play spoilsport in Southampton during India vs New Zealand finale

याआधी 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड सामन्यामध्येही पावसाचा व्यत्यय आला होता, त्यामुळे ही मॅच दोन दिवस चालली होती. अखेर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 4:18 PM IST

ताज्या बातम्या