WTC Final : कधी सुरू होणार सामना? जाणून घ्या साऊथम्पटनचं Weather Update

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची (World Test Championship Final) दोन्ही देशांचे खेळाडू आणि क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते, पण पहिल्याच दिवशी त्यांची निराशा झाली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची (World Test Championship Final) दोन्ही देशांचे खेळाडू आणि क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते, पण पहिल्याच दिवशी त्यांची निराशा झाली आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 18 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची (World Test Championship Final) दोन्ही देशांचे खेळाडू आणि क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते, पण पहिल्याच दिवशी त्यांची निराशा झाली आहे. साऊथम्पटनमध्ये (Southampton Weather) सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे पहिल्या सत्राच्या खेळाला सुरूवात होऊ शकली नाही, तसंच दुसऱ्या सत्राचा खेळ होण्याचीही शक्यता कमी आहे. पावसामुळे अजून टॉसही झालेला नाही, त्यामुळे चाहत्यांना हा मुकाबला कधी सुरू होणार, असा प्रश्न पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार संध्याकाळी उन्ह पडेल, पण शुक्रवारी दिवसभर पाऊस राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साऊथम्पटनमध्ये उन्ह पडेल. दिलासादायक गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये सामना असल्यामुळे तिकडे सूर्यास्त उशीरा होतो. शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये सूर्यास्ताची वेळ 9 वाजून 23 मिनिटं आहे. ऍक्यूवेदर या हवामान खात्याच्या वेबसाईटनुसार दुपारी 1, संध्याकाळी 5 आणि संध्याकाळी 7 वाजता पाऊस थांबण्याचा अंदाज आहे. म्हणजेच शुक्रवारी थांबून थांबून पाऊस पडणार आहे. इंग्लंडच्या मैदानांमध्ये ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे, पण मॅच सुरू होण्यासाठी पाऊस थांबणं गरजेचं आहे. जर मैदान खेळण्या योग्य झालं तर संध्याकाळी सामना सुरू होऊ शकतो. बीबीसी वेदर रिपोर्टनुसार शनिवारी साऊथम्पटनमध्ये उन्ह असेल. तसंच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता अत्यंत कमी असेल. जर ही भविष्यवाणी खरी सिद्ध झाली तर चाहत्यांना हा ऐतिहासिक मुकाबला बघायला मिळू शकतो. या सामन्यासाठी आयसीसीने एक रिझर्व्ह डेदेखील ठेवला आहे. म्हणजेच शुक्रवारचा संपूर्ण दिवस पावसामुळे रद्द झाला तरी फार फरक पडणार नाही. आज जर एकही बॉल टाकला गेला नाही, तर 19-23 जून हे 5 दिवस हाच सामना खेळवला जाईल. भारत-न्यूझीलंडमधली ही मॅच ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल, तसंच पुरस्काराची रक्कमही समसमान वाटण्यात येईल.
    Published by:Shreyas
    First published: