• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली

WTC Final : मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, उडवली खिल्ली

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना डिवचलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) 170 रनवर ऑल आऊट झाला.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना डिवचलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) 170 रनवर ऑल आऊट झाला, यानंतर मायकल वॉनने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. पुढच्या काही तासात मला माझ्या सगळ्यात वाईट भविष्यवाणीबद्दल हजारो भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागेल. न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जिंकेल, असं मी म्हणालो होतो, असं ट्वीट मायकल वॉनने केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारतीय बॅट्समननी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारखे दिग्गज असूनही भारताचा फक्त 170 रनवर ऑल आऊट झाला. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडच्या टीमला फक्त 139 रनची गरज आहे. फायनलच्या राखीव म्हणजेच सहाव्या दिवशी विराट कोहली सगळ्यात आधी आऊट झाला. जेमिसनने त्याला 13 रनवर माघारी धाडलं. या सामन्यात दुसऱ्यांदा जेमिसनने विराटची विकेट घेतली. यानंतर त्याने पुजारालाही 15 रनवर आऊट केलं. टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे15 रनवर, ऋषभ पंत 41 रनवर आणि रवींद्र जडेजा 16 रनवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सनी भारताची दाणदाण उडवून दिली. साऊदीने सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या. तर बोल्टला 3 आणि जेमिसनला 2, वॅगनरला एक विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:Shreyas
  First published: