मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : कोहली-रोहितसाठी मोठी अडचण, टीम इंडियालाही धोका!

WTC Final : कोहली-रोहितसाठी मोठी अडचण, टीम इंडियालाही धोका!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाच्या (Team India) तयारीला सुरुवात झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाच्या (Team India) तयारीला सुरुवात झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाच्या (Team India) तयारीला सुरुवात झाली आहे.

  • Published by:  Shreyas
साऊथम्पटन, 6 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाच्या (Team India) तयारीला सुरुवात झाली आहे. आजच टीम इंडिया सरावासाठी मैदानात उतरली, पण फायनलआधी मॅचचा सराव नसणं टीम इंडियासाठी अडचणीचं ठरू शकतं, अशी चिंता भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी व्यक्त केली आहे. 18 ते 22 जून या कालावधीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. न्यूझीलंडची टीम या ऐतिहासिक सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. भारताकडून 116 टेस्ट खेळणारे वेंगसरकर म्हणाले, विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) चांगल्या लयीत आहेत, पण भारतीय टीमला प्रतिस्पर्धी मॅच खेळायची संधी मिळाली नसल्यामुळे त्यांची कामगिरी प्रभावित होऊ शकते. 'कोहली बराच काळ टीमसोबत आहे, तसंच तो सध्याचा सर्वोत्तम बॅट्समन आहे. कोहली आणि रोहित दोघंही विश्वस्तरीय खेळाडू आहेत. या दोघांना त्यांच्या कामगिरीचा आणि भारताच्या विजयाचा अभिमान असेल, पण मॅचचा सराव नसणं दोघांसाठीही अडचणीचं ठरू शकतं. न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध खेळत असल्यामुळे त्यांचा फायदा आहे,' असं मत वेंगसरकर यांनी व्यक्त केलं. 'भारताची टीम चांगली आहे तसंच ते फॉर्ममध्येही आहेत. न्यूझीलंड मात्र जास्त चर्चेत नसते. या मुकाबल्याआधी त्यांना दोन टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांना तिथल्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा अंदाज येईल, ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. भारतीय टीमने या टेस्टआधी इकडे दोन-तीन टेस्ट खेळायला पाहिजे होत्या, ज्यामुळे त्यांना वातावरण आणि परिस्थिती कळली असती,' असं वेंगसरकर म्हणाले. 'बॅट्समनप्रमाणेच बॉलरनाही मॅच प्रॅक्टिसची गरज असते. तुम्ही नेटमध्ये कितीही सराव करा, पण मैदानात खेळलेल्या मॅचमुळेच तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येतो. मैदानात घालवलेला वेळ कायम फायद्याचा ठरतो, मग तो सराव सामना असला तरी,' अशी प्रतिक्रिया वेंगसरकर यांनी दिली.
First published:

Tags: Cricket news, New zealand, Rohit sharma, Team india, Virat kohli

पुढील बातम्या