• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : वडिलांना खेळता आलं नाही क्रिकेट, पण मुलगा झाला सुपरस्टार!

WTC Final : वडिलांना खेळता आलं नाही क्रिकेट, पण मुलगा झाला सुपरस्टार!

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 21 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसनने (Kyle Jamieson) भारताच्या 5 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, ज्यामुळे टीम इंडियाचा 217 रनवर ऑल आऊट झाला. जेमिसनने आतापर्यंत फक्त 8 टेस्ट मॅच खेळल्या आहेत, पण तरीही त्याने मोठ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्याने या 8 टेस्टमध्ये फक्त 14 च्या सरासरीने 44 विकेट घेतल्या. यात इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा त्याने 5 वेळा केला आहे. जेमिसनचे हे आकडे तो भविष्यातला सुपरस्टार असल्याचं दाखवतात. काईल जेमिसनचे वडीलही क्रिकेटपटू होते, पण त्यांचं करियर स्थानिक क्रिकेटपर्यंतच मर्यादित राहिलं. अखेर काईलने आपल्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण केलं. काईल जेमिसनने बॅट्समन म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. ऑकलंडच्या ग्रामर फर्स्ट इलेव्हनसाठी तो टॉप ऑर्डर बॅट्समन होता. काईल जेमिसनने कॅन्टबेरीकडून 2014 ला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. जेमिसन त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये शून्य रन वर आऊट झाला आणि 30 ओव्हर टाकूनही त्याला एकही विकेट मिळाली नाही. एका अधिकृत नसलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जेमिसनने 110 सामन्यांमध्ये शतक केलं होतं. या मॅचमध्ये जेमिसनने जेम्स अंडरसन, मार्क वूड या फास्ट बॉलरची धुलाई केली होती. या इनिंगनंतर जेमिसन न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या नजरेत भरला. जेमिसनचे वडील मायकल जेमिसनही क्रिकेटपटू होते. त्यांनी ऑकलंडमध्ये क्रिकेट क्लब पैपाटोटोसाठी 7 सामने खेळले आणि आपलं करियर संपवलं. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवलं आणि काही काळातच तो जगभरात लोकप्रिय झाला. काईल जेमिसन 2012 पासून आपल्या बॅटिंगपेक्षा बॉलिंगवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. त्याला रिचर्ड हॅडली यांचे भाऊ डेन हॅडली यांनी बॉलिंगचं प्रशिक्षण दिलं आहे.
  Published by:Shreyas
  First published: