• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final मध्ये घाबरला हा खेळाडू, टॉयलेटमध्ये जाऊन लपला

WTC Final मध्ये घाबरला हा खेळाडू, टॉयलेटमध्ये जाऊन लपला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, पण या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही टीमचे खेळाडू तणावात होते. याच तणाव आणि भीतीमुळे न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसन (Kyle Jamieson) काही वेळ टॉयलेटमध्ये लपला होता.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, पण या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही टीमचे खेळाडू तणावात होते. याच तणाव आणि भीतीमुळे न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसन (Kyle Jamieson) काही वेळ टॉयलेटमध्ये लपला होता. या सामन्यात 7 विकेट घेणाऱ्या काईल जेमिसनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गोल्ड एएमवर कंट्री स्पोर्ट ब्रेकफास्ट या कार्यक्रमात बोलताना जेमिसनने फायनलच्या अखेरच्या दिवसाचा किस्सा सांगितला. 'मॅच बघणं हा तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट होती आणि मी त्याचा भाग होतो. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. टीव्हीवर काही क्षण उशीरा सामना दिसत होता. मैदानात उपस्थित असलेले भारतीय प्रेक्षक एवढा आवाज करत होते, जशी काही विकेटच गेली, पण त्या बॉलला एक रन यायची किंवा डॉट बॉल असायचा. मॅच बघणं खूप कठीण होतं. मी अनेकवेळा बाथरूममध्ये जाऊन लपायचा प्रयत्न केला, कारण तिकडे अजिबात गोंगाट नव्हता. यामुळे मला काही काळ यापासून लांब जाता आलं, कारण तिथली परिस्थिती खूप तणावपूर्ण होती,' असं जेमिसन म्हणाला. 'केन आणि रॉसचं मैदानात असणं दिलासा देणारं होतं. आमच्या दोन महान खेळाडूंनी स्थिती नियंत्रणात आणली आणि आपलं काम पूर्ण केलं,' अशी प्रतिक्रिया जेमिसनने दिली. भारताने दिलेल्या 139 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या पहिल्या दोन विकेट गेल्या, यानंतर विलियमसन (Kane Williamson) आणि टेलरने (Ross Taylor) किवी टीमला एकही धक्का लागू दिला नाही. फायनल संपल्यानंतर जेमिसनला फार जल्लोष करता आला नाही, कारण 48 तासांमध्येच त्याला काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी उतरावं लागलं. जेमसिन काऊंटीमध्ये सरेकडून खेळतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताने एकूण 17 सामने खेळले, यातल्या 12 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आणि 1 मॅच ड्रॉ झाली, तर त्यांनी फक्त एक सीरिज गमावली. भारताने गमवालेली ही सीरिज न्यूझीलंडविरुद्धचीच होती. दुसरीकडे न्यूझीलंडने या स्पर्धेत 7 मॅच जिंकल्या आणि 4 मॅच गमावल्या. फायनलमध्ये विजय मिळवत न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणारी पहिलीच टीम ठरली.
  Published by:Shreyas
  First published: