मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : 84 बॉलमध्ये न्यूझीलंडने बदललं फायनलचं चित्र, टीम इंडिया बॅकफूटवर

WTC Final : 84 बॉलमध्ये न्यूझीलंडने बदललं फायनलचं चित्र, टीम इंडिया बॅकफूटवर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या (New Zealand) टीमने शानदार पुनरागमन केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या (New Zealand) टीमने शानदार पुनरागमन केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या (New Zealand) टीमने शानदार पुनरागमन केलं आहे.

साऊथम्पटन, 20 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या (New Zealand) टीमने शानदार पुनरागमन केलं आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रविवारी न्यूझीलंडने 84 बॉलमध्ये 36 रन देऊन भारताच्या 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 146/3 एवढा होता. फास्ट बॉलर काईल जेमिसनच्या (Kyle Jamieson) नेतृत्वात न्यूझीलंडने भारताला बॅकफूटवर नेलं.

टीम इंडियाला दिवसाच्या 18 व्या बॉलवर पहिला धक्का लागला. काईल जेमिसनने विराटला (Virat Kohli) 44 रनवर आऊट केलं. तिसऱ्या दिवशी विराटला एकही रन करता आली नाही. यानंतर बॅटिंगला आलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) 4 रन करून माघारी परतला. टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण नील वॅगनरला (Neil Wagner) पूल करण्याच्या नादात त्याने कॅच दिला, तेव्हा भारताचा स्कोअर 182/6 एवढा झाला. म्हणजेच टीमने 84 बॉलमध्ये 36 रन करून महत्त्वाचे तीन मोहरे गमावले. तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र संपायच्या आधी भारताला अश्विनच्या (R Ashwin) रुपात आणखी एक धक्का बसला.

विराट कोहलीने आजच्याच दिवशी 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 जून 2011 ला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मागच्या 13 इनिंगमध्ये विराटला एकही शतक करता आलेलं नाही. ही त्याची टेस्ट करियरमधली सगळ्यात खराब कामगिरी आहे. याआधी पदार्पणानंतरही 13 इनिंगमध्ये विराटला शतक करता आलं नव्हतं. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं करण्यासाठी विराटला फक्त एका शतकाची गरज आहे.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india