• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : विराट-केनची 'उलट' रणनिती, कोण मारणार बाजी?

WTC Final : विराट-केनची 'उलट' रणनिती, कोण मारणार बाजी?

पहिला दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) सुरुवात झाली आहे. या सामन्यात केन विलियमसन (Kane Williamson) आणि विराट कोहली (Virat Kohli) याच्या रणनितीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

 • Share this:
  साऊथम्पटन, 19 जून : पहिला दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) सुरुवात झाली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आपणही टॉस जिंकून पहिले फिल्डिंगच केली असती, असं सांगितलं. पण टॉस पडल्यानंतर दोन्ही टीमची रणनिती बरोबर उलटी असल्याचं दिसून आलं. या सामन्यात भारतीय टीम अश्विन आणि जडेजा या दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरली आहे. तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे तीन फास्ट बॉलर टीममध्ये आहेत. न्यूझीलंडने मात्र टीममध्ये एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही. न्यूझीलंडकडे काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट हे फास्ट बॉलर आणि कॉलिन डे ग्रॅण्डहोम हा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे. म्हणजेच न्यूझीलंडच्या टीमने सगळेच फास्ट बॉलर खेळवण्याचा निर्णय घेतला. साऊथम्पटनमध्ये काल दिवसभर पाऊस पडला, त्यामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती, तसंच खेळपट्टीवर गवतही आहे आणि वातावरण ढगाळ राहण्याचा, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाचाही अंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉल स्विंग व्हायची शक्यता जास्त असते, त्यामुळे न्यूझीलंडने सगळे फास्ट बॉलर खेळवण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे न्यूझीलंडने टॉसवेळीच त्यांची टीम घोषित केली. दुसरीकडे भारताने गुरुवारीच टीमची घोषणा केली होती. पण इंग्लंडमधलं वातावरण बघता विराट कोहलीलाही टॉसआधी टीममध्ये बदल करता आले असते, पण भारताने याच खेळाडूंना संधी द्यायचा आपला निर्णय कायम ठेवला. आता विराट कोहली का केन विलियमसनची रणनिती योग्य ठरते आणि कोण बाजी मारतं हे लवकरच स्पष्ट होईल. भारतीय टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडची टीम टॉम लेथम, डेवॉन कॉनवे, केन विलियमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट
  Published by:Shreyas
  First published: