WTC Final आधी केन विलियमसनने घेतली इंजक्शन, कारण...

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये शुक्रवारपासून ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) सुरुवात होणार आहे.

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये शुक्रवारपासून ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) सुरुवात होणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये शुक्रवारपासून ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) सुरुवात होणार आहे. या मुकाबल्यासाठी दोन्ही टीमने पूर्ण तयारी केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकता आली नाही, त्यामुळे हा सामना जिंकायचा ते आटोकाट प्रयत्न करतील, पण केन विलियमसनसह न्यूझीलंडचे अनेक खेळाडू दुखापतींनी ग्रासले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दुखापतींमुळे अनेक खेळाडूंना बाहेर बसावं लागलं होतं. केन विलियमसन याने मात्र टीमचे सगळे खेळाडू आता फिट आहेत असं सांगितलं आहे, तसंच आपल्या कोपराची दुखापतही आता बरी झाली असल्याचं तो म्हणाला. काही दिवसांपूर्वी मी घेतलेल्या इंजक्शनमुळे आता माझी कोपराची दुखापत सुधारली असल्याचं वक्तव्य केन विलियमसनने केलं. कोपराच्या दुखापतीमुळे विलियमसनला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळता आलं नव्हतं. मागच्या काही महिन्यांपासून केन विलियमसन कोपराच्या दुखापतीमुळे त्रासलेला आहे. याच कारणामुळे त्याला बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेली सीरिज आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या काही मॅच खेळता आल्या नव्हत्या. विलियमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही खास कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही इनिंगमध्ये 14 रन करून तो माघारी परतला होता, पण आयपीएलमध्ये मात्र त्याने काही चांगल्या खेळी केल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published: