WTC Final : बुमराहने मोडला आयसीसीचा नियम, चूक लक्षात आल्यावर गेला पॅव्हेलियनमध्ये

WTC Final : बुमराहने मोडला आयसीसीचा नियम, चूक लक्षात आल्यावर गेला पॅव्हेलियनमध्ये

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) त्याच्या बॉलिंगने फार कमाल करता आली नाही. भारताचं प्रमुख अस्त्र असलेल्या बुमराहला या सामन्यात अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेली नाही.

  • Share this:

साऊथम्पटन, 22 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) त्याच्या बॉलिंगने फार कमाल करता आली नाही. भारताचं प्रमुख अस्त्र असलेल्या बुमराहला या सामन्यात अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेली नाही. अनेक क्रिकेटपटूंनी या सामन्यातल्या बुमराहच्या लाईन आणि लेन्थवरही प्रश्न उपस्थित केले. एवढच नाही तर बुमराहने मैदानात उतरताच मोठी चूक केली, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह चुकीची जर्सी घालून मैदानात उतरला होता. एक ओव्हर टाकल्यानंतर बुमराहला त्याची चूक कळली आणि मग तो पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि जर्सी बदलून आला.

पाचव्या दिवशी बुमराहने दिवसाची पहिली ओव्हर टाकली, या ओव्हरमध्ये त्याची लाईन आणि लेन्थ चांगली होती, पण जर्सी बघून मात्र अनेकांना आश्चर्य वाटलं. बुमराहने टीम इंडियाची नेहमीची टेस्ट क्रिकेटची जर्सी घातली, ज्यात स्पॉन्सरचं नाव होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाला वेगळी जर्सी देण्यात आली आहे. बुमराहने पहिली ओव्हर चुकीची जर्सी घालून टाकली, यानंतर तो लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि जर्सी बदलून परत बॉलिंगसाठी आला.

आयसीसी स्पर्धांमध्ये जर्सीचे नियम वेगळे असतात. आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक टीमला जी जर्सी दिली जाते त्याच्या छातीवर देशाचं नाव असतं, पण नेहमीच्या टेस्ट क्रिकेटमध्ये जर्सीच्या छातीवर स्पॉन्सर असतो. आयसीसी स्पर्धेमध्ये मात्र जर्सीवर स्पॉन्सरचं नाव डाव्या किंवा उजव्या हाताच्या दंडावर असतं.

बुमराहसाठी 2021 हे वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये निराशाजनक ठरत आहे. या वर्षी त्याने 6 इनिंगमध्ये 7 विकेट घेतल्या. 2020 मध्येही त्याला 8 इनिंगमध्ये 14 विकेटच मिळाल्या होत्या. बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे नाव कमावलं आहे, त्या हिशोबाने त्याची ही कामगिरी नक्कीच निराशाजनक आहे.

Published by: Shreyas
First published: June 22, 2021, 6:34 PM IST

ताज्या बातम्या