मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : म्हणून विराट इशांतला म्हणाला, विचारतोयस का ओरडतोयस?

WTC Final : म्हणून विराट इशांतला म्हणाला, विचारतोयस का ओरडतोयस?

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने (India vs New Zealand) आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे.

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने (India vs New Zealand) आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे.

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने (India vs New Zealand) आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे.

साऊथम्पटन, 20 जून : भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने (India vs New Zealand) आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. रविवारी मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर टॉम लॅथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी न्यूझीलंडला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. टॉम लेथम 30 रन करून आऊट झाला, अश्विनने (Ashwin) त्याची विकेट घेतली.

न्यूझीलंडची बॅटिंग सुरू असताना 28 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर इशांत शर्माने (Ishant Sharma) डेवॉन कॉनवेविरुद्ध जोरदार अपील केलं, पण अंपायरने नॉट आऊट दिलं. रिप्लेमध्ये कॉनवेच्या बॅटला बॉल न लागताच ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हातात गेल्याचं निष्पन्न झालं. यानंतरही इशांत शर्मा अंपायरसमोर अपील करत होता. यावर विराटने (Virat Kohli) इशांतला विचारलं, अंपायरला विचारत आहेस का त्याच्यावर ओरडत आहेस.

या सामन्यात भारतीय टीम जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या तीन फास्ट बॉलरना घेऊन खेळत आहे, तर स्पिनर म्हणून अश्विन आणि जडेजा आहेत.

भारताची बॅटिंग गडगडली

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केल्यानंतरही भारताची बॅटिंग गडगडली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने भारताच्या 5 विकेट घेतल्या, तर बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टीम साऊदीला एक विकेट घेण्यात यश आलं. भारताने आजच्या दिवसाची सुरुवात 146/3 अशी केली होती, पण विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या दिवशी एकही रन न करता माघारी परतला. जेमिसनने विराटला 44 रनवर एलबीडब्ल्यू केलं.

विराटची विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 49 रनवर, ऋषभ पंत 4 रनवर आणि आर. अश्विन 22 रनवर आऊट झाले. अजिंक्यला वॅगनरने, पंतला जेमिसनने आणि अश्विनला साऊदीने माघारी पाठवलं.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli