Home /News /sport /

WTC Final : न्यूझीलंडचा 'रहाणे'चा कसा सामना करणार टीम इंडिया? एकटा जिंकवू शकतो मॅच

WTC Final : न्यूझीलंडचा 'रहाणे'चा कसा सामना करणार टीम इंडिया? एकटा जिंकवू शकतो मॅच

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये 18-22 जूनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी दोन्ही टीमकडे दिग्गज खेळाडूंची फौज आहे.

पुढे वाचा ...
    साऊथम्पटन, 16 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये 18-22 जूनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी दोन्ही टीमकडे दिग्गज खेळाडूंची फौज आहे. भारताकडे पुजारा, कोहली, रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यासारखे खेळाडू आहेत, तर न्यूझीलंडकडे केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवे हे पर्याय आहेत. याशिवाय किवी टीमकडे हेन्री निकोल्स (Henry Nicholls) सारखा खेळाडू आहे, जो एकटाच मॅचचा निकाल पलटवू शकतो. 29 वर्षांच्या निकोल्सने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधून टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. डावखुरा असलेला निकोल्स पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरतो. भारताकडून या क्रमांकावर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) खेळतो, पण रहाणेपेक्षा निकोल्सचं रेकॉर्ड खूप चांगलं आहे. यावर्षी शानदार फॉर्म हेन्री निकोल्स यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2021 साली निकोल्सने 3 टेस्टमध्ये 65.50 च्या सरासरीने 262 रन केले. पाकिस्तानविरुद्ध जानेवारी महिन्यात त्याने 157 रनची खेळी केली होती. या महिन्यात लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्याने 175 बॉल खेळून 61 रन केले होते. निकोल्सने टेस्ट क्रिकेटमध्ये 39 मॅचमध्ये 43.40 च्या सरासरीने 2,257 रन केले, यामध्ये 7 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 174 रन आहे. निकोल्सने त्याच्या करियरमध्ये 6 शतकं पाचव्या क्रमांकावर आणि एक शतक सहाव्या क्रमांकावरकेलं. केन विलियमसन आणि रॉस टेलरनंतर निकोल्स बॅटिंगला येतो. अजिंक्य रहाणेने या क्रमांकावर खेळताना 38.81 च्या सरासरीने रन केले आहेत, तर निकोल्सची सरासरी 44.60 एवढी आहे. हेन्री निकोल्सने केलेल्या 7 शतकांपैकी 6 टेस्टमध्ये न्यूझीलंडला विजय मिळाला. भारताविरुद्ध खराब कामगिरी हेन्री निकोल्सचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. त्याने 3 टेस्टच्या 5 इनिंगमध्ये 15.25 च्या सरासरीने 61 रन केले. भारताविरुद्ध निकोल्सचा सर्वाधिक स्कोअर 24 रन आहे. ज्या देशांविरुद्ध निकोल्स टेस्ट खेळला, त्यातल्या भारताविरुद्धची त्याची सरासरी सगळ्यात खराब आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, New zealand, Team india

    पुढील बातम्या