WTC Final भारत जिंकणार का न्यूझीलंड? विराट-केनचे आकडे काय सांगतात?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

  • Share this:
    साऊथम्पटन, 15 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे हे दोघंही आपला पहिलाच किताब जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतील, यात शंका नाही. पण आतापर्यंतच्या आकड्यांकडे बघितलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचं पारडं कायमच जड राहिलं. भारताचं पारडं जड भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टेस्ट सीरिज खेळवल्या गेल्या, यातल्या 11 सीरिज भारताने आणि 6 सीरिज न्यूझीलंडने जिंकल्या, तर 4 सीरिज ड्रॉ झाल्या. 1955 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट मॅच होत आहेत. यात भारताने 21 सामने जिंकले तर किवींना 12 सामने जिंकता आले आणि 26 टेस्ट ड्रॉ झाल्या. विराटच्या नेतृत्वात भारत मजबूत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने 60 टेस्टपैकी 36 टेस्ट जिंकल्या, तर 14 टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला. विराट कर्णधार अताना भारताने 10 टेस्ट ड्रॉ केल्या. तर दुसरीकडे केन विलियमसनने 35 टेस्टमध्ये किवी टीमचं नेतृत्व केलं, यातल्या 21 सामन्यांमध्ये न्यूझीलंडला विजय मिळाला, 8 टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 6 टेस्ट ड्रॉ झाल्या. विराट-केनचं रेकॉर्ड सारखंच विराट आणि केन विलियमसन यांचं टेस्ट रेकॉर्ड जवळपास सारखंच आहे. विराटने 91 सामन्यांमध्ये 52.38 च्या सरासरीने 7,490 रन केले. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 27 शतकं आणि 25 अर्धशतकं आहेत. 254 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. केन विलियमसनने 84 सामन्यांमध्ये 52.03 च्या सरासरीने 7,129 रन केले. केनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 24 शतकं आणि 32 अर्धशतकं आहेत. विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 7 द्विशतकं आणि केनने 4 द्विशतकं केली आहेत. घरच्या मैदानात दोघं शेर घरच्या मैदानात विराटच्या नेतृत्वात भारताने 30 पैकी 23 टेस्ट जिंकल्या तर फक्त दोन टेस्टमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. तर केन विलियमसनने न्यूझीलंडमध्ये 22 टेस्टमध्ये नेतृत्व केलं, यात 16 टेस्ट त्यांनी जिंकल्या तर फक्त एकमव सामन्यात त्यांचा पराभव झाला. परदेशामध्ये केन विलियमसन कर्णधार असताना न्यूझीलंडचा फक्त 3 सामन्यात विजय झाला तर 7 सामने त्यांना गमवावे लागेल. दुसरीकडे विराटने परदेशात 30 मॅचमध्ये कॅप्टन्सी केली, यात भारताचा 13 मॅचमध्ये विजय आणि 12 सामन्यात पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published: