• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी!

WTC Final : विराटची रणनिती त्याच्यावरच उलटली, IPL मध्येच दिसली कमजोरी!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) दुसऱ्या इनिंगमध्येही टीम इंडियाची (Team India) बॅटिंग सपशेल अपयशी ठरली आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) दुसऱ्या इनिंगमध्येही टीम इंडियाची (Team India) बॅटिंग सपशेल अपयशी ठरली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 170 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडला पहिल्या इनिंगमध्ये 32 रनची आघाडी मिळाल्यामुळे त्यांना विजयासाठी 139 रनचं आव्हान मिळालं. राखीव दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) रुपात दोन धक्के लागले. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) या दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. जेमिसनने ऑफ स्टम्प बाहेर टाकलेला बॉल मारण्याचा विराटने प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि विकेट कीपर बीजे वॉटलिंगने त्याचा सोपा कॅच पकडला. 15 रन करून विराट आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्येही जेमिसननेच विराटला एलबीडब्ल्यू केलं होतं. जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनची एकाच सामन्यात दोनदा विकेट घेतल्यामुळे आणि तीदेखील फायनलमध्ये, त्यामुळे जेमिसनचं कौतुक होत आहे. जेमिसनने या सामन्यात फक्त विराटच नाही तर पुजारा, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्याही विकेट घेतल्या. वेग आणि स्विंगच्या मदतीने जेमिसनने भारतीय बॅट्समनना खूप त्रास दिला, पण विराट कोहलीसारखा दिग्गज बॅट्समन जेमिसनसमोर अपयशी कसा ठरला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. IPL मध्येच हेरली कमजोरी? काईल जेमिसनने विराटला टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा आऊट केलं आहे. आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येही जेमिसनने विराटची विकेट घेतली होती, त्यानंतर आता साऊथम्पटनच्या दोन्ही इनिंगमध्येही त्याने विराटला आऊट केलं. विराट कोहली यालाही काईल जेमिसनची बॉलिंग आवडली, त्यामुळे त्याने आयपीएलमध्येही जेमिसनला आरसीबीच्या टीममध्ये घेतलं. आरसीबीने लिलावात जेमिसनवर तब्बल 15 कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएलमध्ये जेमिसनने विराटसोबत बराच वेळ घालवला. नेटमध्येही त्याने विराटला बॉलिंग केली, बहुतेक तेव्हाच जेमिसनने विराट कोहलीची कमजोरी हेरली. आयपीएल दरम्यानच विराटने जेमिसनला ड्युक बॉलने बॉलिंग करण्याची विनंती केली होती, पण जेमिसनने याला नकार दिला होता. आपल्या कर्णधारालाच स्पष्ट शब्दात नकार दिल्यामुळे जेमिसनचं कौतुकही करण्यात आलं. जेमिसनने फक्त 16 टेस्ट इनिंगमध्ये 46 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: