• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळही रद्द, महामुकाबल्याची ड्रॉकडे वाटचाल?

WTC Final : पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळही रद्द, महामुकाबल्याची ड्रॉकडे वाटचाल?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) चौथ्या दिवसही पावसामुळे फुकट गेला आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 21 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) चौथ्या दिवसही पावसामुळे फुकट गेला आहे. त्यामुळे आता या सामन्याचा निकाल लागणं कठीण झालं आहे, कारण दिवसभर खेळ झाला नसल्याने निकाल लागण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांमध्ये तीन इनिंग पूर्ण व्हाव्या लागणार आहेत. पावसामुळे या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ झाला नाही, तसंच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पाऊस आणि खराब प्रकाशामुळे दिवसाच्या ओव्हर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 101/2 एवढा झाला. दिवसाअखेरीस केन विलियमसन (Kane Williamson) 12 रनवर आणि रॉस टेलर (Ross Taylor) 0 रनवर खेळत आहेत. किवी टीम अजून 116 रननी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारतीय बॉलरना दोन विकेट घेण्यात यश आलं. टॉम लेथमला (Tom Latham) अश्विनने (R Ashwin) 30 रनवर आणि डेवॉन कॉनवेला (Devon Conway) इशांत शर्माने (Ishant Sharma) 54 रनवर आऊट केलं. त्याआधी दिवसाच्या सुरुवातीला भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने (Kyle Jamieson) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 49 रनसह भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.
  Published by:Shreyas
  First published: