• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : भारत-न्यूझीलंडचे खेळाडूही ICC वर नाराज

WTC Final : भारत-न्यूझीलंडचे खेळाडूही ICC वर नाराज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) पावसाचाच खेळ सुरू आहे. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत या सामन्यात फक्त 141.1 ओव्हरचाच खेळ झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) पावसाचाच खेळ सुरू आहे. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत या सामन्यात फक्त 141.1 ओव्हरचाच खेळ झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा (Team India) 217 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 101 रन केले. जर पावसामुळे असाच व्यत्यय आला आणि कोणतीच टीम विजयी होऊ शकली नाही, तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल. पावसामुळे क्रिकेट होत नसल्यामुळे माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आपली नाराजी उघड केली. 'हे चाहत्यांसाठी दु:खद आहे. मला आयसीसीचे (ICC) नियम योग्य वाटले नाहीत. सगळ्यांनी सगळं काही केलं, तुम्हाला एक चॅम्पियन बघण्याची इच्छा आहे. एवढा वेळ असल्यानंतर 5 दिवस रोज 90 ओव्हरच्या हिशोबाने 450 ओव्हर टाकल्या जातील, अशी अपेक्षा होती. आयसीसीकडूनही माझी तशीच अपेक्षा होती. सगळे जण उत्साहित होते. एक दिवस राखीवही ठेवण्यात आला होता, पण यानंतरही खेळ पूर्ण होईल, असं वाटत नाही,' असं लक्ष्मण म्हणाला. तर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने तर हा सामना इंग्लंडमध्ये व्हायलाच नको होता, असं रोखठोक मत मांडलं आहे. तसंच दुबईमध्ये हा सामना व्हायला पाहिजे होता, असं ट्वीट पीटरसनने केलं. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बॉण्ड (Shane Bond) यानेही आपण लक्ष्मणच्या मताशी सहमत आहोत, असं सांगितलं आहे. 'दोन्ही टीम विजयासाठी खेळतात. खेळपट्टीवर बॉलर्ससाठी खूप काही होतं, त्यामुळे 3-4 दिवसात आपल्याला निकाल मिळू शकतो. तुम्हाला 450 ओव्हर सर्वोत्कृष्ट क्रिकेट बघायची इच्छा असते,' अशी प्रतिक्रिया बॉण्डने दिली. तसंच संजय बांगर यानेही या मॅचचा निकाल लागणं गरजेचं होतं, असं मत मांडलं. न्यूझीलंडला शेवटच्या इनिंगमध्ये 150-160 रनचं आव्हान मिळालं, तरी चौथ्या इनिंगमध्ये त्यांना कठीण जाईल, असं संजय बांगरला (Sanjay Bangar) वाटतं. याआधी 2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्येही भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी 23 जूनला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिले पाच दिवस निर्धारित ओव्हर झाल्या नाहीत, तर सहाव्या दिवशी मॅच खेळवली जाईल, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पावसामुळे बराच काळ फुकट गेला आहे, त्यामुळे सहाव्या दिवशीही मॅच खेळवली जाईल, हे निश्चित आहे. तरीही निकाल लागला नाही, तर भारत-न्यूझीलंड या दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.
  Published by:Shreyas
  First published: