• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • WTC Final : 13 वर्ष, 5 खेळाडू आणि इतिहासाची पुनरावृत्ती, भारत-न्यूझीलंड सामन्यात योगायोग

WTC Final : 13 वर्ष, 5 खेळाडू आणि इतिहासाची पुनरावृत्ती, भारत-न्यूझीलंड सामन्यात योगायोग

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये 13 वर्षानंतर पुन्हा एकदा अजब योगायोग बघायला मिळाला आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 19 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये 13 वर्षानंतर पुन्हा एकदा अजब योगायोग बघायला मिळाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याच्यासाठी हा मुकाबला महत्त्वाचा आहे. दोन्ही कर्णधारांचा आयसीसीच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. आयसीसीने टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात केली होती. 9 टीममध्ये ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवली गेली. फायनलमध्ये टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहली आणि डावखुरा स्पिनर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) खेळत आहेत. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसन, फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) मैदानात उतरले आहेत. या पाचही खेळाडूंमध्ये एक खास नातं आहे. विराट, जडेजा, विलियमसन, बोल्ट आणि साऊदी हे पाच खेळाडू 2008 साली अंडर-19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्या मॅचमध्येही विराटकडे टीम इंडियाचं आणि विलियमसनकडे न्यूझीलंडचं नेतृत्व होतं. भारताने हा सामना तीन विकेटने जिंकला होता. न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 205 रन केले. ओपनिंगला बॅटिंग केलेल्या केन विलियमसनने 37 रनची खेळी केली, त्याला विराटने आऊट केलं. या सामन्यात कोहलीला 2 विकेट मिळाल्या होत्या, तर जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं होतं. पावसामुळे टीम इंडियाला या सामन्यात 43 ओव्हरमध्ये 191 रनचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 41.3 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून पूर्ण केलं. विराट कोहलीला 43 रन करता आले, केन विलियमसनने त्याचा कॅच पकडला. तर जडेजा एक रन करून आऊट झाला. न्यूझीलंडकडू टीम साऊदीने 4 आणि ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली. त्या वर्ल्ड कपमध्ये पुढे भारताने ट्रॉफीही जिंकली होती. फायनलमध्ये भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेचा 12 रनने पराभव केला होता.
    Published by:Shreyas
    First published: