WTC Final : पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ, तरीही 5 दिवस होणार सामना

WTC Final : पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ, तरीही 5 दिवस होणार सामना

भारत आणि न्यूझीलंडमधल्या (India vs New Zealand) महामुकबाल्याच्या (World Test Championship Final) पहिल्याच दिवशी क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 18 जून : भारत आणि न्यूझीलंडमधल्या (India vs New Zealand) महामुकबाल्याच्या (World Test Championship Final) पहिल्याच दिवशी क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. साऊथम्पटनमध्ये सततच्या पावसामुळे दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे या ऐतिहासिक सामन्याचा टॉसही होऊ शकला नाही. आता शुक्रवारपासून सामन्याला सुरुवात होणार आहे.

पहिला दिवस पावसामुळे फुकट गेला असला, तरी हा सामना 5 दिवस चालणार आहे. पावसाचा व्यत्यय पाहता आयसीसीने आधीच या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे. पावसामुळे जर निर्धारित ओव्हरचा खेळ पूर्ण झाला नाही, तसंच त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही, तर उरलेला सामना सहाव्या दिवशी खेळवला जाईल, पण याबाबतचा निर्णय मॅच रेफ्री घेणार आहे. हा सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल, तसंच बक्षिसाची रक्कमही समसमान देण्यात येईल.

दरम्यान या सामन्यासाठी टीम इंडियाने एक दिवस आधीच अंतिम-11 खेळाडूंची घोषणा केली आहे. विराट कोहलीने या सामन्यासाठी दोन स्पिनर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

Published by: Shreyas
First published: June 18, 2021, 2:38 PM IST

ताज्या बातम्या