Home /News /sport /

WTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण आहे खास

WTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण आहे खास

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) निसर्गाने संकट उभं केलं आहे. पहिला दिवस पावसाने रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे बराच काळ खेळ झाला नाही.

    साऊथम्पटन, 19 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) निसर्गाने संकट उभं केलं आहे. पहिला दिवस पावसाने रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे बराच काळ खेळ झाला नाही. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर खास विक्रम झाला. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही 61 वी मॅच आहे. भारताकडून टेस्टमध्ये एवढ्या मॅचचं नेतृत्व करणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे, त्याने धोनीचं 60 टेस्टमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम मोडित काढला. हा सामना जिंकून पहिली आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचं विराटचं स्वप्न आहे. विराट कोहली कर्णधार म्हणून 99 वी इनिंग खेळत आहे. जर पुढच्या इनिंगमध्ये विराटला खेळण्याची संधी मिळाली तर ती त्याची 100 वी इनिंग असेल. आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला असा विक्रम करता आलेला नाही. कर्णधार म्हणून विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 5 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. नाबाद 254 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. विराट भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे. भारत-न्यूझीलंड फायनलमध्ये रोहित शर्मा 34 रनवर, शुभमन गिल 28 रनवर आणि चेतेश्वर पुजारा 8 रनवर आऊट झाले. ट्रेन्ट बोल्ट, काईल जेमिसन आणि नील वॅगनर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पॉण्टिंगचं रेकॉर्ड मोडण्याची संधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोहलीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचं (Ricky Poining) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक 41 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. विराटच्या नावावरही एवढीच शतकं आहेत. त्यामुळे या सामन्यात शतक केलं तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार ठरेल. विराटचं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालं होतं. कोलकात्यामध्ये झालेल्या डे-नाईट सामन्यात विराटने 136 रनची खेळी केली होती. यानंतर मात्र विराटला एकही शतक करता आलेलं नाही. तेव्हापासून विराटने 39 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या