WTC Final चा आणखी एक दिवस पाण्यात, चाहते ICC वर भडकले

WTC Final चा आणखी एक दिवस पाण्यात, चाहते ICC वर भडकले

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा (World Test Championship Final) चौथा दिवसही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे, यामुळे चाहत्यांनी आयसीसी (ICC) वर निशाणा साधला आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 21 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा (World Test Championship Final) चौथा दिवसही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. याआधी पहिल्या दिवसाचा खेळही पावसामुळे झाला नाही, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही संपूर्ण ओव्हर झाल्या नाहीत. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातला हा सामना 18 जूनला सुरू झाला आहे, तसंच 23 जूनला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पाचव्या दिवसापर्यंत मॅचचा निकाल लागला नाही, तर उरलेल्या ओव्हरचा सामना या राखीव दिवशी खेळवता येणार आहे.

इंग्लंडमधल्या या हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीवर टीका केली आहे, तसंच यापुढे इंग्लंडमध्ये कोणत्याही आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणीही चाहत्यांनी केली आहे.

भारताचा पहिल्या इनिंगमध्ये 217 रनवर ऑल आऊट झाला, यानंतर तिसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 101 रन केले होते. किवी टीम अजूनही 116 नने पिछाडीवर आहे. या सामन्यात आत्तापर्यंत 141.1 ओव्हरचा खेळ झाला आहे, यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

आयसीसीने (ICC) दुसऱ्या ठिकाणी हा सामना आयोजित का केला नाही, जर आधीपासूनच पावसाचा अंदाज होता? असा सवाल एका चाहत्याने उपस्थित केला.

सोशल मीडियावर एका यूजरने मीम शेयर केलं, यामध्ये त्याने केन विलियमसनच्या (Kane Williamson) फोटोवर एक गाण पोस्ट केलं.

साऊथम्पटनमधल्या पावसाच्या खेळामुळे आता हा सामना सहाव्या दिवशीही खेळवला जाईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसांमध्ये निकाल लागायचा असेल तर तीन इनिंग पूर्ण व्हायला लागतील, अन्यथा मॅच ड्रॉ होईल आणि दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल.

Published by: Shreyas
First published: June 21, 2021, 8:36 PM IST

ताज्या बातम्या